High Blood Pressure Control Tips: आजच्या वेगवान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, व्यायामाचा अभाव व अनियमित दिनचर्या यांमुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, अशक्तपणा व सांधेदुखी यांसारख्या आरोग्य समस्या झपाट्याने वाढत आहेत. अनेकांना औषधांवर अवलंबून राहावं लागतं; पण काही वेळा आहारातील छोटासा बदलही मोठा फरक घडवू शकतो… आणि इथेच लक्ष वेधून घेतं एक छोटंसं गुपित…

काय आहे हे गुपित, जे शरीराला देऊ शकतं बळकटी?

तज्ज्ञ डॉ. विद्या गुप्ता यांच्या मते, रोजच्या आहारात एक साधा पदार्थ समाविष्ट केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हा पदार्थ शरीरातील विविध प्रक्रियांना चालना देतो आणि अनेक तक्रारी कमी करण्यास साह्य करू शकतो.

उच्च रक्तदाब आणि हृदयासाठी कसा उपयुक्त?

तज्ज्ञ डॉ. विद्या गुप्ता यांच्या मते, या पदार्थामध्ये असलेली ओमेगा-३ फॅटी आम्ले आणि तंतुमयता (फायबर) या घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचणारे अपायकारक कोलेस्ट्राॅल कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते, असेही मत व्यक्त केले जाते.

Award Banner

शरीराला ऊर्जा आणि शक्ती देणारा

दिवसभर थकवा, अशक्तपणा जाणवणाऱ्यांसाठी हा पदार्थ फायदेशीर ठरू शकतो. शरीराला आवश्यक पोषण देऊन ऊर्जा वाढवण्यास तो साह्य करतो. त्यामुळे रोजच्या कामांसाठी लागणारी ताकद टिकून राहते.

पोषणमूल्यांचा समृद्ध स्रोत

या पदार्थामध्ये ओमेगा-३ फॅटी आम्ले, प्रथिने, जीवनसत्त्व बी१, तसेच मँगनीज, तांबे व जस्त यांसारखी खनिजे आढळतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकतं?

काही संशोधनांनुसार, या पदार्थातील गुणधर्म शरीरातील अपायकारक पेशींची वाढ मंदावण्यास मदत करू शकतात. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याशिवाय रक्ताल्पता (रक्त कमी होणे) आणि सांधेदुखी व सूज यांसारख्या त्रासांमध्येही फायदा होऊ शकतो.

पचन सुधारणा आणि वजन नियंत्रण

या पदार्थातील तंतुमय घटकामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. या पदार्थामुळे पोट भरल्याची भावना जास्त वेळ टिकते आणि अनावश्यक भूक कमी लागते. परिणामी वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होऊ शकतं.

सेवन करण्याची योग्य पद्धत

हा पदार्थ हलक्या आचेवर भाजून बारीक करून घ्यावा. त्यानंतर तो पोळीच्या पिठात, दह्यात किंवा सॅलडमध्ये मिसळून खाता येतो. त्याचे लाडू तयार करूनही सेवन करता येऊ शकते.

महत्त्वाची खबरदारी

या पदार्थाच्या सेवनाचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे. दिवसाला साधारण २० ग्रॅम (दोन चमचे) इतकेच त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी, वायू किंवा पचनाच्या तक्रारी उदभवू शकतात. कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कोणता आहे तो ‘बी’चा पदार्थ?

हे चमत्कारिक गुणधर्म असलेलं बी म्हणजेच अळशीचे बी (फ्लॅक्ससीड).

निष्कर्ष :

दैनंदिन आहारात छोटासा बदल करूनही मोठा आरोग्यदायी फायदा मिळवता येऊ शकतो. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने अळशीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, अशक्तपणा व सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळू शकते.