ways to keep your water tank cool : उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाशाचा सर्वात जास्त परिणाम घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांवर होतो. सूर्याची उष्णता छतावर थेट पडते आणि त्यामुळे टाकीतील पाणी गरम होतं. काही वेळा प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाण्याचं तापमान खूप वाढू शकतं, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी गरम वाटतं आणि काहीवेळा त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. कधी भांडी घासताना, तर कधी तोंड धुताना नकळत नळातून गरम पाणी येऊ लागतं…
कारण दुपारपर्यंत, टाकीतील पाणी स्पर्शालाही न लागण्याइतके गरम होते, ज्यामुळे ते आंघोळीसाठी किंवा दैनंदिन वापरासाठी अयोग्य ठरते. शिवाय, सततच्या उष्णतेमुळे पाण्याची ताजेपणाही कमी होतो आणि कधीकधी त्याला हलका वास किंवा शिळेपणाही जाणवतो. त्यामुळे, उन्हाळ्यात पाण्याच्या टाक्या थंड ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आपण सगळ्यांनीच केले पाहिजेत.
रंग
काळ्या किंवा गडद रंगाच्या टाक्या उन्हाळ्यात जास्त गरम होतात. टाकीला पांढरा किंवा फिकट रंग दिल्याने सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे पाणी जास्त गरम होत नाही.
सावली द्या
टाकीला थेट सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी, प्लास्टिक शीट, जाळी, पत्र्याचे किंवा फायबरचे आवरण वापरा. यामुळे पाणी जास्त गरम होण्यापासून संरक्षण करता येते.
कापड
टाकीवर ओला, जाड कापड किंवा तागाचे कापड ठेवल्याने पाणी जास्त गरम होण्यापासून वाचते. त्यावर वेळोवेळी पाणी टाकून ओले केल्याने टाकीचे तापमान थंड राहण्यास मदत होते.
ओली गोणी
टाकीवर ओली गोणी, जाड कापड किंवा तागाचे कापड ठेवल्याने पाणी गरम होण्यापासून थांबवता येते. वेळोवेळी गोणी ओली केल्याने टाकीचे तापमान कमी ठेवण्यास मदत होते.
गवत आणि थर्माकोल
टाकीभोवती सुके गवत, थर्माकोल शीट किंवा इन्सुलेशन शीट ठेवल्याने उष्णता टाकीपर्यंत पोहोचण्यापासून रोखली जाते आणि पाणी थंड राहते. याव्यतिरिक्त, टाकी थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी स्टँडवर ठेवा. यामुळे खालून येणारी उष्णता कमी होते.
झाडे लावा
टाकीच्या आजूबाजूला अनेक झाडे किंवा वेली लावल्याने तापमान कमी होण्यास आणि सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
ही घरगुती युक्ती वापरून पाहा…
- टाकीतील पाण्याचे तापमान कमी करण्यासाठी आणखी एक घरगुती युक्ती वापरली जाऊ शकते. यासाठी थर्माकोल शीट, ताग किंवा गोणीचे कापड, तार आणि सेल्युलोझ टेपची आवश्यकता असते.
- टाकीच्या आकारानुसार थर्माकोल शीट कापून घ्या आणि ती टाकीभोवती घट्ट चिकटवून घ्या. शीट खूप जाड नसावी. त्यानंतर, टाकी तागाच्या गोणीने झाका आणि तारेने बांधा. यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होतो.
- सकाळी गोणीला हलकेच ओले करा. ओल्या गोणीमुळे टाकीतील पाण्याचे तापमान कमी होण्यास मदत होते.
