How to choose the best capsicum : सहसा आई आपल्याला मार्केटमधून भाजी आणायला अजिबात सांगत नाही. कारण- बरेच जण भाजी आणायला तर जातात; पण भाजी योग्य रीत्या न तपासता तशीच घेऊन येतात. मग ती भाजी बनविण्यापूर्वी निवडताना किंवा स्वच्छ करताना अर्ध्याहून जास्त प्रमाणात तर टाकूनच द्यावी लागते. तर २००७ मध्ये मौला मेरे मौला या गाण्याद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने योग्य ढोबळी मिरची (सिमला मिरची) निवडण्याची एक टीप सांगितली आहे.

नौहीद सेसुरीने चाहत्यांना नेहमीच हटके फूड हॅक्स, रेसिपी आणि बरंच काही सांगत असते. अलीकडेच सिमला मिरचीच्या (capsicum) खाली असलेल्या उंचवट्यांवरून (bumps) चव कशी ओळखायची याबद्दल तिने सांगितले आहे. ज्या ढोबळी मिरचीला ४ उंचवटे किंवा पाकळ्या (bumps) असतात, ती थोडी जास्त गोड असून, ती सलाडमध्ये वापरायला चांगली असते आणि ज्या मिरचीला ३ उंचवटे असतात, ती कमी गोड असते, जी भाजी किंवा स्वयंपाकासाठीसुद्धा वापरली जाते.

तर या टीपबद्दलची अधिक माहिती समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने ‘टोन ३० पिलेट्स’ येथील फिटनेस डायटिशियन व न्यूट्रिशनिस्ट आश्लेषा जोशी यांच्याशी संपर्क साधला…

४ उंचवटे आणि ३ उंचवटे यामध्ये फरक काय?

१. सिमला मिरचीचा गोडवा केवळ तिच्यावरील उंचवट्यांच्या संख्येवर अवलंबून नसून, त्यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण आणि ती किती पिकली आहे यावरसुद्धा अवलंबून असतो. चार उंचवट्यांच्या सिमला मिरच्या अनेकदा अधिक गोड असण्यामागे हे एक कारण आहे. त्या शिमला मिरचीची साल किंचित जाड असते आणि त्यात साखरेचं प्रमाणही जास्त तयार होतं. हे असं होतं. कारण- ती वाढत असताना तिला जास्त सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे त्यांना एक सौम्य, नैसर्गिकरीत्या गोड चव येते, ज्यामुळे त्या कच्च्या खाण्यासाठी उत्तम ठरतात.

२. दुसरीकडे, तीन उंचवटे असणाऱ्या शिमला मिरच्या अधिक घट्ट आणि किंचित कडू असतात. तसेच, त्यांची चव जास्त तिखट असते. त्यांच्या घट्ट रचनेमुळे त्या परतून, भाजून किंवा परतून शिजवण्यासाठी अधिक योग्य ठरतात. कारण- त्या उष्णतेतही चांगल्या टिकून राहतात.

उंचवट्या किंवा पाकळ्यांचा पोषणमूल्यांवर परिणाम होतो का?

केवळ उंचवट्यांच्या संख्येवर आधारित पोषणमूल्यांमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही फरक सिद्ध झालेला नाही. दोन्ही प्रकारच्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट्स आणि डाएटरी फायबर हे घटक भरपूर प्रमाणात असतात. महत्त्वाचे म्हणजे शिमला मिरची किती गोड आहे हे तिच्या पिकण्यावर आणि रंगावर अवलंबून असतं. पाकळ्या किंवा उंचवट्यांची संख्या काहीही असली तरीही लाल आणि पिवळ्या सिमला मिरच्यांमध्ये हिरव्या मिरच्यांपेक्षा साधारणपणे जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्या अधिक गोड असतात.

शिजवणे आणि गोडवा

उन्हाळ्यात सिमला मिरचीची चवही बदलू शकते. ही मिरची शिजवल्याने त्यातील शर्करा तुटते आणि पेशींची भिंत मऊ होते, ज्यामुळे कडूपणा कमी होतो आणि गोडवा वाढतो. चार उंचवट्यांच्या आधीच गोड असलेल्या शिमला मिरच्या शिजवल्याने कॅरमेलाइज्ड चव अधिक गडद होते. तर, अधिक टणक आणि किंचित कडू सिमला मिरच्यामध्ये उष्णता त्यांची तिखट चव सौम्य करण्यास आणि त्यांना अधिक रुचकर बनवण्यास मदत करते

योग्य सिमला मिरची निवडणे

१. उंचवटे किंवा पाकळ्यांव्यतिरिक्तची पद्धत म्हणजे रंग पाहणे. ही एक विश्वासू टीप आहे. हिरव्या सिमला मिरच्या कमी पिकलेल्या आणि किंचित कडू असतात, तर पिवळ्या, नारंगी आणि लाल मिरच्या पूर्णपणे पिकलेल्या आणि नैसर्गिकरित्या अधिक गोड असतात. चकचकीत, टणक पृष्ठभाग असलेली सिमला मिरची निवडा. ही ताजी आणि पोषक तत्वांनी भरपूर असते.

२. पुढच्या वेळी तुम्ही सलाड किंवा भाजी बनवत असाल, तेव्हा मिरची निवडताना तिचे उंचवटे लक्षात ठेवा…

३. चार उंचवटे असणारी सिमला मिरचीची चव गोड असते आणि ती कच्च्या पदार्थांसाठी (सलाड) उत्तम असते. तर ३ उंचवटे असणारी सिमला मिरची कमी गोड, शिजवण्यासाठी (भाजी, stir-fry) योग्य असते

म्हणजे योग्य सिमला मिरची निवडली, तर पदार्थाची चव अजून छान लागे