सणासुदीच्या काळात साडीमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग फ्लोरल प्रिंट ब्लाउजचे ‘हे’ डिझाईन वापरून पाहा

लग्न कार्य असो किंवा मग ऑफीमधले इव्हेंट्स…प्रत्येक कार्यक्रमात महिला वर्ग साडी परिधान करून स्वतःला स्टायलिश लूक देण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या बाजारात फ्लोरल प्रिंट ब्लाउजचा नवा ट्रेंड आलाय. फ्लोरल प्रिंट ब्लाउजच्या फॅशनने तुम्ही इतरांत वेगळे आणि सर्वाधिक स्टायलिश दिसाल.

floral-print-blouse
(फोटो क्रेडिट- Indiva Designs Instagram)

लग्न कार्य असो किंवा मग ऑफीमधले इव्हेंट्स…प्रत्येक कार्यक्रमात महिला वर्ग साडी परिधान करून स्वतःला स्टायलिश लूक देण्याचा प्रयत्न करत असतात. ब्लाउजची फिटिंग आणि डिझाईन योग्य नसेल तर महागडी साडी सुद्धा डल दिसते. त्यामुळे ब्लाउजच्या पॅटर्न आणि फिटिंगकडे विशेष लक्ष द्या. या नव्या स्टायलिश साडी-ब्लाउज डिझाईन्स अनुसरून बघाच. सुंदर दिसाल. सध्या बाजारात फ्लोरल प्रिंट ब्लाउजचा नवा ट्रेंड आलाय. फ्लोरल प्रिंट ब्लाउजच्या फॅशनने तुम्ही इतरांत वेगळे आणि सर्वाधिक स्टायलिश दिसाल.

सणासुदीच्या काळात बहुतेक स्त्रिया आणि मुली साड्या आणि ड्रेस सूट फ्लोरल प्रिंट्समध्ये परिधान करण्याला पसंती देतात. ही सध्याची महिलांची पहिली पसंती बनली आहे. केवळ साड्याच नव्हे तर ब्लाउज, टॉप, ओव्हरकोट, श्रग आणि चपला देखील फ्लोरल प्रिंटमध्ये परिधान करण्याचा जणू ट्रेंडच बनलाय. फ्लोरल प्रिंट साड्या आणि ब्लाउजमुळे खूप सुंदर आणि एथनिक लुक मिळतो. जर तुम्हाला कोणत्याही इव्हेंटमध्ये किंवा लग्नाला जायचं असेल तर तुम्हाला फ्लोरल प्रिंट ब्लाउजच्या स्टाईलने एक अतिशय सुंदर आणि जरा हटके लुक मिळेल. आज बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे फ्लोरल प्रिंट ब्लाउजचे डिजाईन्स सापडतील.

तुम्ही या फ्लोरल प्रिंट ब्लाउजवर कोणत्याही प्रकारच्या डिजाईन्सच्या साडीने स्टाईल करू शकता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन आणि वेगळा लूक मिळेल.

फुल स्लीव्ह ब्लाउज: तुम्ही फ्लोरल प्रिंट ब्लाउज कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत परिधान करू शकता. फ्लोरल प्रिंटमध्ये फुल स्लीव्ह ब्लाउज घातल्याने तुम्हाला एलिगंट लुक मिळतो. तुम्ही त्यासोबत जड कानातले घालू शकता. पण यावर कोणतेही दागिने घालू नका. कारण फ्लोरल प्रिंट ब्लाउज साडीला खूप हायलाइट करतो. तुम्हाला इच्छा असेल तर, तुम्ही बोट नेकलाइनसह तुमचा ब्लाउज बनवू शकता. तसंच, या स्टाईलमध्ये मेकअप थोडा हलकाच ठेवण्याचा प्रयत्न करा.

नेट साडी कॉम्बिनेशन: नेट साडीवर फ्लोरल प्रिंट ब्लाउज अतिशय आकर्षक लुक देतो. नेटची साडी वजनाने थोडी हलकी असते. त्यामुळे लग्न आणि पार्ट्यांमध्ये महिलांची नेट साडीसाठी पहिली पसंती असते. फ्लोरल प्रिंट ब्लाउज असलेली नेट साडी तुम्हाला नाईट फंक्शन्समध्ये अतिशय ग्लॅमरस लूक देते.

मॅचिंग साडी: तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्लोरल प्रिंट ब्लाउजसोबत फ्लोरल प्रिंट साडीही कॅरी करू शकता. ही स्टाईल तुम्हाला एथनिक वेअरमध्ये मॉडर्न लुक देते. याच्यासोबत तुम्ही आणखी थिन बेल्ट कॅरी करू शकता.

फ्लोरल एम्ब्रॉयडरी ब्लाउज: फ्लोरल प्रिंट्ससोबतच फ्लोरल एम्ब्रायडरी लूकसुद्धा सध्याच्या काळात खूप लोकप्रिय बनलाय. या स्टाईलमध्ये ब्लाउजवर फुलांच्या वेगवेगळ्या डिजाईन्स धाग्याच्या साहाय्याने कोरलेल्या असतात. यामुळे तुम्हाला अतिशय सुंदर लुक मिळू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tips for styling floral print blouse draping with saree fashion tips prp