Tips for Thyroid Patients: निष्काळजी जीवनशैली आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयी यांमुळे बहुतेक लोक थायरॉईड रोगाने ग्रस्त असतात. पूर्वी वृद्ध लोक थायरॉईड रोगाला बळी पडत असत; परंतु आता आजकाल प्रौढांनाही या आजाराने ग्रासले आहे. महिलांना हा आजार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा दुप्पट असते. १८ ते ३५ वयोगटातील महिलांनी, विशेषतः गर्भवती महिलांनी, हा आजार टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. थायरॉईड ग्रंथीद्वारे स्रावित होणारे थायरॉक्सिन हे संप्रेरक मानवी क्रियाकलापांसाठी मर्यादित प्रमाणात आवश्यक आहे.

थायरॉईड हा आता एक सामान्य आजार झाला आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. थायरॉईडमुळे तणाव, झोप न येणे, चिंता यांसारखी लक्षणेदेखील दिसतात. थायरॉईड हा आनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन, आयोडीनची कमतरता किंवा तणाव यांसह अनेक कारणांमुळे होऊ शकतो. थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात या संप्रेरकाच्या अनियमित पातळीमुळे हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो. अशा परिस्थितीत थायरॉईड टाळण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

फुलकोबी आणि कोबी: आरोग्य तज्ज्ञ थायरॉईडच्या समस्या असलेल्या लोकांना कोबी आणि फुलकोबी मर्यादित प्रमाणात खाण्याचा किंवा टाळण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय ब्रोकोलीदेखील या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. या हिरव्या भाज्यांमध्ये गॉयट्रोजनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात थायरॉईडचे कार्य सुरू करू शकते. त्याशिवाय या भाज्यांमधील फायबर थायरॉईड रुग्णांसाठी घातक ठरू शकते.

ग्लुटेन असलेले पदार्थ: बाजरीसारख्या ग्लुटेन असलेल्या पदार्थांमध्ये गॉइट्रोजेन नावाचे संयुगदेखील असते, जे या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हानिकारक असू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ग्लुटेनचा संबंध थेट थायरॉईड वाढीशी आहे. गहू, बाजरी, बार्ली व राई यांसारख्या अनेक धान्यांमध्ये ग्लुटेन मुबलक प्रमाणात आढळते. म्हणूनजर रुग्णांना स्वस्थ राहायचे असेल आणि त्यांचे थायरॉईड नियंत्रणात ठेवायचे असेल, तर ग्लुटेनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

कॉफी: अनेकांना कॉफी पिणे आवडते आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तथापि, थायरॉईड रुग्णांना कॉफीचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः औषधे घेतल्यानंतर. कारण- कॉफीमुळे थायरॉईडची औषधे अप्रभावी ठरू शकतात. त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होऊ शकते आणि त्याचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवरदेखील होऊ शकतो आणि लोकांना जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.