फॅटी लिव्हर ही यकृताशी संबंधित एक गंभीर समस्या आहे. याने यकृताचे कामकाज प्रभावित होते. अयोग्य आहार आणि मद्यपान अधिक केल्याने ही समस्या होते. मद्यपान न करणारे आणि करणारे अशा दोन्ही व्यक्तींना ही समस्या होऊ शकते. मद्यपान न करणाऱ्यांना योग्य आहार न घेतल्याने ही समस्या होते. फॅटी लिव्हरची काही लक्षणे दिसून येतात, ती वेळीच ओळखल्याने ही समस्या टाळता येऊ शकते.

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

सामान्य भाषेत यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला फॅटी लिव्हर म्हणतात. जर चरबीचे वजन यकृतापेक्षा ५ टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तरीही त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात.

फॅटी लिव्हरचे दोन टप्पे

पहिले, जे अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे होते, त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. दुसरे म्हणजे, नॉन – अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये यकृताच्या आत चरबी असते, पण त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. परंतु नंतरच्या टप्प्यात समस्या येऊ शकतात. स्टीटो हेपेटायटीस हा मद्यपान न करणाऱ्यांमध्ये दुसरा टप्पा आहे. लवकरच याची काळजी घेतली नाही तर अवघड होऊ शकते. परिणामी, सिरॉसिस होण्याचा धोका आहे. तिसरा टप्पा, ज्यामध्ये यकृत संकुचित होऊन घट्ट होते. यकृताची कार्य क्षमता नगण्य होते. उपचार न केल्यास सिरॉसिसमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

ही आहेत लक्षणे

  • फॅटी लिव्हरची समस्या असल्यास पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूला वेदना होतात.
  • भूक कमी लागते आणि काही लोकांचे वजन देखील लवकर कमी होऊ लागते.
  • डोळ्यांचा रंग पिवळा दिसून येतो.
  • पायांमध्ये थोडी सूज येते.
  • थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

हा आहे इलाज

  • वरील कुठलीही लक्षणे अधिक काळ शरीरात दिसून आल्यास डॉक्टरकडे जावे. आवश्यक औषधांचे सेवन करावे आणि आहाराबाबत काळजी घ्यावी.
  • जर तुम्ही अधिक मद्यपान करत असाल तर तुरंत टाळा, अन्यथा समस्या वाढू शकते.
  • जर तुमचे वजन अधिक असेल तर व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा, संतुलित आहार घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)