tips to cover and treat thinning hair in men prp 93| पुरूषांचे विरळ झालेल्या केसांसाठी हे करा उपाय | Loksatta

पुरूषांचे विरळ झालेल्या केसांसाठी हे करा उपाय

वयाच्या 35 व्या वर्षी पुष्कळ पुरुषांमध्ये केस गळण्यास सुरवात होते. निवृत्तीनंतर ते जवळजवळ संपूर्ण टक्कल पडतं. त्यामुळे वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी काही खास टिप्स…

पुरूषांचे विरळ झालेल्या केसांसाठी हे करा उपाय
(Photo: freepik)

स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनाही केस पातळ होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. पुरुषांना टक्कल पडणे आणि केस पातळ होणे हे जनुक, वय, हार्मोन्स आणि अलीकडेच रासायनिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या केसांच्या उत्पादनांचा अति-वापरासह बर्‍याच गोष्टींना जबाबदार आहे. वयाच्या 35 व्या वर्षी पुष्कळ पुरुषांमध्ये केस गळण्यास सुरवात होते. निवृत्तीनंतर, ते जवळजवळ संपूर्ण टक्कल पडतं. त्यामुळे वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी काही खास टिप्स…

द इस्थेटिक क्लिनिक्सच्या सल्लागार त्वचारोग तज्ञ, कॉस्मेटिक त्वचारोग तज्ञ आणि त्वचारोग-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी केस पातळ होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स शेअर केल्या आहेत.

पुरूषांमध्ये केस गळती आणि टक्कल पडणे यावर काही उपाय जाणून घेण्याआधी या समस्येमागची कारणं काय आहेत, हे ही जाणून घेणं गरजेचं आहे. पुरूषांमध्ये केस गळती आणि विरळ होण्यामागची अनेक कारणे आहेत. हार्मोन्समध्ये अचानक बदल झाल्यामुळे, कुटूंबात टक्कल पडण्याची अनुवंशिकता असल्यामुळे, केसात कोंडा होण्याच्या समस्येमुळे, थायरॉइडची समस्या, रक्तातील लोहाच्या समस्येमुळे, आहारात प्रोटिन्स आणि बायोटिन यांची कमतरता, अपुरी झोप, मानसिक ताणतणाव, केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पुरूषांमध्ये केसांच्या समस्या उद्भवतात. तसंच एंड्रोजेनेटिक एलोपेसिया, वृद्धत्व, धूम्रपान, अल्कोहोल आणि ड्रग्सचे सेवन, ल्यूपस आणि मधुमेह सारखे आजार देखील याला कारणीभूत आहेत.

पावडर आणि कन्सीलर हे विरळ केसांची समस्या दूर करण्यासाठीचे जुने उपाय आहेत. तुम्हाला जर तुमच्या डोक्यावरील विरळ केस दाट करायचे असतील तर तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये तुमच्या त्वचारोग तज्ज्ञ/हेअर स्पेशलिस्टकडे जाऊन आपली समस्या सांगणं, तुमच्या स्टायलिस्टचा सल्ला घेणं आणि घरी केसांची अतिरिक्त काळजी घेणं या तीन गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊया.


केस विरळ होण्यावर तज्ज्ञांकडून उपचार: जर तुम्हाला एंड्रोजेनेटिक एलोपेसियाचा त्रास होत असेल तर यावर कायमस्वरूपी इलाज नाही. परंतु असे अनेक प्रभावी उपाय आहेत जे केसांची वाढ पुन्हा पहिल्यासारखी करण्यास मदत करतात आणि केस गळती कमी करतात. आपल्या केसांच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करा आणि योग्य उपाय लवकरात लवकर सुरू करा. यासाठी खालीलप्रमाणे काही पर्याय आहेत.

रोगाइन/मिनोक्सिडिल : हे तुमच्या केसांच्या मुळांमध्ये रक्त आणि पोषक द्रव्ये निर्माण करण्यात मदत करतात. याचा परिणाम सुमारे दोन ते सहा महिन्यात दिसून येतो. एकदा आपण हे सुरू केलं की या उपचाराचे फायदे दिसून येतील. हे वापरण्यास अगदी सोपं आहे आणि पॉकेट फ्रेंडली सुद्धा आहे.

Finasteride/ Propecia : हे एक तोंडाने घेण्यासाठीचं औषध आहे. जे आपल्याला घेणं आवश्यक आहे. हे औषध काही महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत घेऊ शकतो.

QR678 हेअर रिग्रोथ थेरपी: ही नवीन मेड इन इंडिया इनोव्हेशन जगभरात प्रशंसा मिळवत आहे. हे केवळ केस गळणे थांबवण्यास मदत करत नाही तर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय जलद आणि निरोगी केसांच्या निर्मीतीसाठी मदत करतं आणि याचे परिणाम कायम टिकून राहतात.

अ‍ॅन्टी फंगल शॅम्पू : केटोकोनाझोल हे तुमच्या टाळूवरील कोणत्याही संसर्गाशी लढण्यास मदत करतं. हा शॅम्पू कमीतकमी पाच मिनिटांपर्यंत तरी आपल्या टाळूवर लावून ठेवा.

ज्यांच्याकडे मृत केशरचना आहे त्यांच्यासाठी केस प्रत्यारोपण हा शेवटचा उपाय आहे. यामुळे एक विचित्र दिसणारी केसांची रचना होऊ शकते. यामुळे तुमच्या स्टाईलला खराब करण्याची शक्यता जास्त असते.

हेअरस्टायलिस्टची मदत : उपचारांचा प्रभाव दिसून येत असताना, तुम्ही तुमचे केस पातळ होण्याला वेगळ्या पद्धतीने स्टाईल करण्याचा प्रयत्न करू शकता. बर्याच हेअर स्टाईल आहेत जे मुलांसाठी साजेसे असतात.

हे घरगुती उपाय एकदा वापरून पाहा :

आवळा (गुसबेरी) आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण: तुमच्या टाळू आणि केसांवर आवळा पावडर आणि लिंबाचा रस यांचं गुळगुळीत मिश्रण लावा. ते सुकेपर्यंत लावून ठेवा. काही वेळाने धुवून टाका. आठवड्यातून एकदा हे वापरा.

अंड्यातील पिवळ बलक : अंड्यातील पिवळ बलक टाळूवर लावा आणि 30 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवून काढा. (वास काढून टाकण्यासाठी). अंड्यातील प्रथिने पेप्टाइड्स केस गळती रोखण्यास मदत करतात. हे तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.

आठवड्यातून एकदा गरम खोबरेल तेल/ ग्रीन टीने तुमच्या टाळूची मालिश केल्याने टाळू उत्तेजित होण्यास मदत होते आणि केस गळण्यास प्रतिबंध होतो.

अर्धा कप नारळाचं दूध आणि ३ चमचे ऑलिव्ह ऑईल वापरून हेअर मास्क बनवा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर मुळांपासून सुरु होऊन टोकापर्यंत मसाज करा. सुमारे 15 मिनिटे शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. शॅम्पू धुवून टाका.

2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, बदाम आणि खोबरेल तेल 1-1 चमचे आणि आवश्यक तेलाचे काही थेंब वापरून व्हिटॅमिन ई हेअर मास्क केसांना लावा. यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करतं.

इतरही गोष्टी देखील केस गळती थांबवण्यासाठी मदत करतात. केस खूप वेळा न धुणे, आपल्या टाळूला घाम मुक्त ठेवणे, हेअर ड्रायर वापरणे टाळा आणि हेअर कलरचा वापर मर्यादित ठेवा. आपल्या केसांची काळजी घेणे आणि त्वचाशास्त्रज्ञांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-10-2021 at 20:46 IST
Next Story
नवरात्रीचे उपवास करताना घटवा वजन! जाणून घ्या सोप्या टिप्स