आयुष्यातील काही चुका किंवा घटना या वर्तमानकाळातील वाट बिकट करतात. सतत त्या गोष्टी मनाला टोचतात आणि त्याने मानसिक त्रास होतो. पण, पुढे जाण्यापूर्वी या गोष्टी विसरणे गरजेच्या आहेत. केलेल्या चुका विसरण्यासाठी स्वत:ला क्षमा करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी व्यक्तीमध्ये सहानुभूती, करुणा आणि दयाळूपणा हे भाव असावे लागतात. स्वत:ला क्षमा केल्यास अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात.

स्वत:ला क्षमा करण्यासाठी पुढील गोष्टी फायदेशीर ठरू शकतात

१) स्वत:शी चांगले राहा

स्वत:शी चांगले राहा. आयुष्य हे परिपूर्ण नाही, ते जगताना अनेक खाचखळगे येतात. आपण ठरवले त्यानुसार नेहमी होत नाही. त्यामुळे स्वत:वर प्रेम करा. चांगले राहा.

(COVID : ताप, थकवा नव्हे तर आता ‘हे’ आहे कोविडचे प्रमुख लक्षण, म्युटेशनमुळे घडले अनेक बदल)

२) चुकांपासून शिका

जीवनात सहज पुढे जाण्यासाठी चुकांपासून शिकणे गरजेचे आहे. आयुष्यात तुम्हाला जे काही मिळाले त्याचे तुम्ही योग्यरित्या वापर केले, अशी जाणीव स्वत:ला करून द्या. याने स्वत:ला माफ करणे सोपे जाईल.

३) जबाबदारी घ्या

जो पर्यंत तुम्ही स्वत:बरोबर आणि इतरांबरोबर केल्याला अन्यायाची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वत:ला माफ करता येणार नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्या.

(अधिक तहान लागणे ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला)

४) स्वत:ला माफी पत्र लिहा

केलेली चूक कशी सुधाराल याबाबत एका चिठ्ठीत लिहा. ती चूक परत होऊ नये यासाठी ती चिठ्ठी मोठ्याने वाचा.

५) आयुष्यात पुढे जा

एका गोष्टीवर वेळ आणि उर्जा घालवणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. सतत एकाच गोष्टीचा विचार केल्याने काही मिळणार नाही. यामुळे तुम्हाला सकारात्मक कामे करण्यास समस्या होईल.