थायरॉईड ग्रंथी ही आपल्या शरीरातील चयापचय क्रियेला नियंत्रित करते. जी मानेच्या समोरील भागात असते. थायरॉइडची समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळते. थयरॉईड हार्मोन्स तयार करते जे शरीरातील अनेक महत्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. थायरॉईड ग्रंथीने जर योग्यरित्या काम केले नाही तर याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थायरॉईड ग्रंथीने अधिक प्रमामात हार्मोन्स तयार केले तर हायपरथायरॉईडिझमची समस्या होते. याने चयापचय क्रिया वाढते, वजन कमी होणे, नैराश्य, आणि हृदयाचे ठोके वाढण्याची समस्या होऊ शकते. तेच कमी प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यास हायपोथायरॉइडिझमची समस्या होते. यात वजन वाढणे, थकवा वाढणे या समस्या होतात. थायरॉईडला सूज देखील येते. पेशींच्या अनियमित वाढीमुळे ही सूज येते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीने व्यवस्थित काम करणे गरजेचे आहे. थायरॉईडला आलेली सूज कमी करण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

(६६ मुलांच्या मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेनं ‘या’ ४ भारतीय औषधींबाबत जारी केला अलर्ट)

१) बदामाचे सेवन करा

बदामाच्या सेवनाने थायरॉईडला आलेली सूज कमी करण्यात मदत होऊ शकते. बदामध्ये मॅग्नेशियम असते जे थायरॉईड ग्रंथीला आलेली सूज कमी करण्यात फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर, बदाममध्ये फायबर आणि मिनरल्स देखील असतात जे पचनक्रिया चांगली ठेवण्यात मदत करू शकतात.

२) जवसाच्या बियांचे सेवन

थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचा देखील वापर करता येऊ शकते. जवसाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि जिवनसत्व ब १२ हे मोठ्या प्रमाणात असतात जे सूज कमी करण्यात मदत करू शकतात.

(फॅटी लिव्हरने होऊ शकतो कर्करोग, त्याची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा)

३) साखरेचे प्रमाण कमी असलेले आहार

थायरॉईडची समस्या झाल्यास शुगर फ्री पदार्थांचे सेवन केले पाहिजे. साखर आणि प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ सूज वाढवू शकतात. त्यामुळे, ती कमी करण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी असलेला आहार घेतला पाहिजे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to lower swelling in the thyroid ssb
First published on: 06-10-2022 at 16:58 IST