फळे आणि भाज्या या ताज्या खाणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात. मात्र, सर्वांना ताजे खाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनके जण भाज्या, फळे फ्रिजमध्ये राखून ठेवतात. मात्र, फ्रिजमध्ये देखील ते खराब होतात. सध्या नवरात्री सुरू असल्याने लोक घरी फळ आणून ठेवतात. फळे, सुके मेवे खराब होऊ नये, ते फ्रेश राहावे यासाठी पुढील टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

१) कोथिंबीर

कोथिंबीर ताजी राहावी यासाठी तिला पाण्यात ठेवा. कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. किंवा कोथिंबीर धुवून तिला सुकवा नंतर तिला टिश्यू पेपरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवून द्या.

(बोटांची साल निघते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर)

२) केळी

केळींना कधी फ्रिजमध्ये स्टोर करून नये. थंडीत केळी अधिक पिकतात. केळी पिकू नये यासाठी केळीचे टोक जिथे आहे, ज्या ठिकाणापासून ती इतर केळींना जोडलेली आहे त्या ठिकाणी अ‍ॅल्युमिनियम फॉईल गुंडाळा. अ‍ॅल्युमिनियम फॉईल नसल्यास तुम्ही पॉलिथिन गुंडाळू शकता.

३) नट्स

अक्रोड, काजू सारखे नट्स फ्रेश आणि क्रंची ठेवण्यासाठी एअरटाइट बॉक्समध्ये ठेवून त्यांना फ्रिजमध्ये स्टोर करा.

४) कांदे

बटाटे आणि कांदे कधी सोबत ठेवू नका. कारण बटाट्यातून निघणारे रसायन हे कांदे खराब करू शकतात. त्यामुळे कांदे अधिक काळ टिकवण्यासाठी त्यांना बटाट्यासोबत ठेवू नका.

(चेहऱ्याप्रमाणे मानही उजळेल, काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय)

५) लिंबू

लिंबू अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते ताजे राहतीलच असे नाही. त्यांना झिप लॉक पाऊच किंवा पॉलिथिनमध्ये ठेवा आणि त्यांना घट्ट बांधून ठेवा. जर तुम्ही त्यांचा रस काढणार असाल तर प्रथम ते कोमट पाण्यात टाका.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)