हात आणि पायांवरील स्ट्रेच मार्क्स हे शरीराला हानी पोहोचवत नाही. मात्र त्यांच्यामुळे लोकांना अस्वस्थ वाटते. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. सामान्यत: गर्भधारणेनंतर किंवा वजन कमी झाल्यानंतर शरीराच्या अनेक भागांवर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. नसांसारखे दिसणारे हे मार्क्स काही घरगुती उपयांनी कमी करता येऊ शकतात. आज या उपयांबाबत आपण जाणून घेऊया.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी हे उपाय करा

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

१) कोरफडचा वापर

कोरफडमध्ये अँट-ऑक्सिडेंट गुण असतात जे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यात मदत करू शकतात. प्रभावित भागावर रोज कोरफडचे जेल लावल्यास फरक दिसून येईल. आंघोळ झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी हा उपाय करा.

२) अंडे आणि ‘जीवनसत्व क’च्या गोळ्या

स्ट्रेच मार्क हटवण्यासाठी अंडे आणि ‘जीवनसत्व क’च्या गोळ्या उपयुक्त ठरू शकतात. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असते जे त्वचेला बरे करण्यात मदत करते. तर स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी जीवनसत्व क फायदेशीर आहे. तुम्ही २ अंड्यांच्या पांढऱ्या भागाला आणि ‘जीवनसत्व क’च्या २ गोळ्यांना एका भांड्यात फेटा आणि ते ब्रशच्या मदतीने प्रभावित भागावर लावा. कोरडे झाल्यानंतर स्वच्छ धुवा.

(World Diabetes Day 2022: ‘या’ अवयवांमध्ये सूज येणे हे रक्तातील साखर वाढण्याचे धोकादायक लक्षण)

३) नारळ आणि बदामाचे तेल

नारळ आणि बदामाचे तेल स्ट्रेच मार्क हटवण्यात मदत करू शकतात. यासाठी नारळ आणि बदाम या दोघांचे तेल समप्रमाणात मिसळा आणि प्रभावित भागावर नियमित लावा.

४) काकडी आणि लिंबाच्या रसाचा वापर

लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक अम्ल असते जे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करते, तर काकडीचा रस त्वचा ताजे ठेवण्यास मदत करतो. तुम्ही हे दोन्ही समान प्रमाणात प्रभावित भागावर लावा आणि सुमारे 10 मिनिटांनी धुवा.