घराच्या स्वच्छतेमधील सर्वात महत्त्वाची स्वच्छता असते ती टॉयलेट. आरोग्याच्यादृष्टीने याठिकाणची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. अनेक वेळा अशा प्रकारचे डाग आणि घाण टॉयलेटवर जमा होतात, जी कितीही साफ केलं तरी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. घरात जास्त लोक असतील तर जास्त वापराने टॉयलेट लवकर खराब होते. रोजच्या धावपळीत आपल्याकडे टॉयलेट साफ करायला वेळ असतोच असे नाही त्यामुळे आपण अगदी रोज नाही तरी घाईगडबडीत २ ते ३ दिवसांनी किंवा आठवड्यानी टॉयलेट स्वच्छ करतो. मात्र, त्यावेळीही हा पिवळटपणा निघतोच असे नाही. आता एका गृहिनीने सोशल मिडियावर टॉयलेट नव्या सारखा चमकविण्यासाठी जुगाड दाखवला आहे. तो आपण पाहूयात…

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी टॉयलेटमध्ये केसांना लावणारा तेल टाकलं आहे का? नाही ना.. मग एकदा टॉयलेटमध्ये तेल टाकून बघा. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. आपण टॉयलेटमध्ये टॉयलेट क्लिनर टाकतो. पण या महिलेने चक्क तेल टाकला आहे. या व्हिडीओमध्ये टॉयलेटमध्ये तेल टाकताच कमाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहा…

Horrible video
VIDEO : बापरे! चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
The little girl is hugging and kissing the snake
बापरे! चिमुकली सापाला मारतेय मिठी अन् घेतेय चुंबन; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिचे आई-वडील वेडे…”
Jugaad Video
Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
a young boy hide Cigarette and Match Box in chappal
बापरे! घरच्यांना कळू नये म्हणून लपवली चक्क चप्पलमध्ये सिगारेट अन् आगपेटी, तरुणाचा जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल!
Tigress Vs Bear On Camera Fight:
VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही
Bajaj Auto launched Pulsar NS400Z
VIDEO : मार्केटमध्ये आता बजाजचा बोलबाला! आणली नवी दमदार पल्सर; फीचर्स पाहून व्हाल थक्क, किंमत…
a bride fell down during varmala ceremony
VIDEO : वरमाला घालण्यासाठी नवरदेवाने उडी मारली अन् नवरी धाडकन खाली आपटली, व्हिडीओ होतोय व्हायरल

(हे ही वाचा : Jugaad Video: सफाई करण्याआधी तुमच्या घरातील झाडूला टुथपेस्ट लावून पाहा; काय कमाल झाली एकदा पाहाच!)

व्हिडिओमध्ये गृहिणीने दाखवल्यानुसार, महिलेने सर्वात आधी टॉयलेटमध्ये शॅम्पू टाकलं आहे. नंतर त्या महिलेने हलक्या हाताने ब्रशने टायलेट घासून काढलं आहे. त्यानंतर दहा मिनिटे शॅम्पू टॉयलेटला लावलेलं तसचं ठेवलं आहे. दहा मिनिट झाल्यानंतर महिलेने टायलेट पाण्याने धूवून काढले. त्यानंतर टिश्श्यू पेपरच्या साहाय्याने महिलेने टायलेटचं सीट पुसून काढलं. नीट पुसून काढल्यानंतर महिलेने टिश्श्यू पेपरच्या मदतीने टायलेटला तेल लावलं आहे. तेल लावल्याने टॉयलेट सीटवर पाणी थांबणार नाही. तेलामुळे टॉयलेट चिकट झाल्याने पाण्याबरोबर त्यावरील घाण पटकन निघून जाईल, टॉयलेटमधील दुर्गंधी दूर होऊन टॉयलेट तुमचं स्वच्छ होईल, असे महिलेचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडिओ

 

Laxmi Majagahe या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)