टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदकं जिंकून जगभरात देशाची मान उंचावणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंसाठी शाओमीने एक घोषणा केली आहे. शाओमीकडून या सर्व पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना Mi 11 अल्ट्रा स्मार्टफोन देण्यात येणार आहे. शाओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. यावेळी, मनुकुमार जैन म्हणाले की, आम्ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी लागणाऱ्या सर्व खेळाडूंच्या संयम आणि समर्पणाला महत्त्व देतो. याचसाठी सर्व भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे आभार मानण्यासाठी शाओमीकडून Mi 11 Ultra ही खास भेट देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताने इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली आहेत. यामध्ये १ सुवर्णपदक, २ रौप्य पदकं आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमधली ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मीराबाई चानूने या टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. तर ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदकाचा मानकरी केलं. २००८ नंतर प्रथमच भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळालं आहे. याच अभिमानास्पद कामगिरीबद्दल या सर्व खेळाडूंना शाओमीने ही भेट देण्याची घोषणा केली आहे.

Tokyo Olympics 2020 मध्ये भारताची दमदार कामगिरी

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये, नीरज चोप्रा (सुवर्ण), मीराबाई चानू (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लवलिना बोर्गोहेन (कांस्य), पुरुष हॉकी संघ (कांस्य) आणि रवी कुमार दहिया (रौप्य) यांनी ही पदकं जिंकली आहेत.

Xiaomi Mi 11 Ultra ची वैशिष्ट्ये

शाओमी एमआय ११ अल्ट्रामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचसोबत, यात १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.६७-इंचाचा क्यूएचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये खूप मोठा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचसोबत, या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेल आहे. तर रियर कॅमेरा मॉड्यूलजवळ १.१ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमी एमआय ११ अल्ट्रामध्ये ६७W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Xiaomi Mi 11 Ultra ची किंमत

शाओमी एमआय ११ अल्ट्रा हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. १२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी या स्मार्टफोनची किंमत फक्त ६९,९९९ रुपये इतकी आहे. तर Mi 11X हा भारतात उपलब्ध असलेल्या Mi 11 मालिकेतील बजेट ऑफर आहे. याच्या ६ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics 2020 xiaomi big gift to all indian medal winners gst
First published on: 10-08-2021 at 12:30 IST