Health benefits of Figs: आपण निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याची सवय लावतो, पण काही विशिष्ट फळे आपल्या शरीरावर इतके चांगले परिणाम करतात की त्यांचं रोजचं सेवन आवश्यक ठरतं. असेच एक फळ म्हणजे अंजीर. दिसायला साधं पण बहुगुणांनी भरलेलं हे फळ प्राचीन काळापासून आयुर्वेदात उपयुक्त मानलं गेलं आहे. अंजीर सुकवून खाल्लं तरी त्याचे पोषणमूल्य टिकून राहतं आणि ते सहजपणे साठवून ठेवता येतं. अंजीर हे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच चवीलाही स्वादिष्ट आहे आणि त्याचे गुणधर्म तर त्याहूनही आश्चर्यकारक आहेत. अंजीर खायला गोड आणि मऊ असतs. सुके अंजीर कुरकुरीत असतात. अंजीर शरीराच्या प्रत्येक भागासाठी फायदेशीर आहे. अंजीर खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. याच कारणामुळे अंजीर खाल्ल्यानंतर भूक कमी होते आणि परिणामी वजनही कमी होते. अंजीर हृदयाला बळकट करते, याशिवाय मधुमेहावरही अंजीरच्या पानांनी उपचार केला जातो.

बीबीसी गुड फूडनुसार, ३० ग्रॅम सुक्या अंजीरमधून ६८ कॅलरीज ऊर्जा मिळते. त्यामध्ये १.१ ग्रॅम प्रथिने, ०.५ ग्रॅम चरबी, १५ ग्रॅम कर्बोदके, ३ ग्रॅम फायबर, २९१ मिलिग्रॅम पोटॅशियम, ७५ मिलिग्रॅम कॅल्शियम, २४ मिलिग्रॅम मॅग्नेशियम आणि १.२६ मिलिग्रॅम लोह देखील असते. या पोषक घटकांमुळे अनेक मौल्यवान फायदे मिळतात.

अंजीरचे ५ आश्चर्यकारक फायदे

पचनशक्ती वाढते

बीबीसी गुडफूडनुसार, अंजीर आतड्यांचे पोषण करण्यासाठी नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात. अंजीरमधील फायबरमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म देखील असतात, जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या निरोगी समूहाच्या (गट बायोम) विकासास हातभार लावतात आणि पचनसंस्था मजबूत करतात.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

अंजीरमध्ये पॉलीफेनॉल नावाची संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते ऑक्सिजनला इतर रसायनांशी अभिक्रिया करण्यापासून रोखतात, ज्यामुळे ऑक्सिडेशन टळते. याचा अर्थ पेशी निरोगी राहतात आणि त्वचेचे नुकसानापासून संरक्षण होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

आपण खातो त्या अन्नात मिठाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होते. पोटॅशियमच्या असंतुलनामुळे रक्तदाब वाढू शकतो. ताजी अंजीर खाल्ल्याने शरीरातील पोटॅशियमची पातळी नैसर्गिकरित्या वाढते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे संबंधित अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे.

हाडांना पोलाद बनवते

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी अनेक खनिजे असतात. त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण विशेषतः जास्त असते. अंजीरमध्ये पोटॅशियमदेखील असते, आणि ही सर्व खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

वजन नियंत्रित केले जाते

वजन कमी करण्यासाठी अंजीर हे एक उत्तम फळ आहे. त्यात उच्च दर्जाचे फायबर असते. त्याचे सेवन केल्याने सर्व पोषक तत्वे मिळतात आणि भूक कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे.