सोन्याची खरेदी करणे ही आपल्या भारतीयांची भलतीच आवड असते. कुणी हौसेसाठी तर कुणी गुंतवणूकीसाठी सोन्याची खरेदी करतच असतो. पण फक्त १०० रूपयांपासून सोन्याची खरेदी करता आली तर ….? होय. काही दिवसांनी सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात जास्तित जास्त सोनं विक्री करण्यासाठी अनेक ज्वलर्स वेगवेगळ्या स्कीम्स सुरू करत आहेत. करोना महामारीच्या काळात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी अनेक ज्वेलर्सनी तर कमीत कमी १०० रूपयांपासून सोन्याची ऑनलाईन खरेदी सुरू केलीय. आपल्याला हवं तेव्हा सोन्याची होम डिलिव्हरी घेऊ शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक रूपयाची गुंतवणूक करून आपण हळूहळू ही रक्कम वाढवू शकता. तसंच जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण सोने किंवा मोठा परतावा मिळवू शकता. यासाठी ऑनलाईन सोने विकणारी काही पोर्टल्स देखील उपलब्ध आहेत. सोने विकणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी डिजिटल क्षेत्रात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

करोना महामारीनंतर ऑनलाइन सोन्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली होती. याच कारणामुळे पारंपारिक ज्वेलर्सना त्यांच्या व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्यास आणि डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकण्यास भाग पाडलं आहे.

टाटा समूहाचे तनिष्क, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड, सेन्को गोल्ड आणि डायमंड्स यासारख्या कंपन्यांनी अशा ऑफर्स सुरू केल्या आहेत. त्यांनी ऑनलाइन सोने विक्रीच्या ऑफर आधीच सुरू केल्या आहेत, अशी माहिती ब्लूमबर्ग डॉट कॉमने दिली आहे.

या प्रमुख कंपन्या थेट ग्राहकांना किंवा डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्मसोबत टाय-अप करून ऑनलाइन सोन विकण्याची योजना आखत आहेत. यात ग्राहक किमान एक ग्रॅम सोने खरेदी केल्यानंतर सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकतात. एका ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ४,५०० रुपये इतकी आहे.

भारतात ऑनलाइन सोने खरेदी ही नवीन संकल्पना नसली तरी, ती फक्त काही ई-कॉमर्स, काही समर्पित पोर्टल आणि मोबाईल वॉलेट्सद्वारे ऑफर केली गेली. देशातील पारंपरिक ज्वेलर्स मात्र ऑनलाइन सोने विक्रीपासून दूर राहिले आहेत. पण ते सुद्धा आता सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येण्याच्या तयारीत आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याची विक्री सहसा वाढते कारण अनेक कुटुंब या काळात पिवळी धातू खरेदी करू पाहत आहेत. तथापि, कोविड -19 महामारीनंतर सोने आणि इतर दागिन्यांच्या भौतिक विक्रीला मोठा फटका बसला. सणासुदीच्या काळात लोकांचा कल सोन्याची खरेदी करण्याकडे जास्त असतो. कोविड -19 महामारीनंतर सोने आणि इतर दागिन्यांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे.

अनेक भारतीय विशेषत: तरुण ज्यांना ऑनलाइन खरेदी करण्याची माहिती असलेले ग्राहक स्टोअरला भेट न देता डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करताना दिसून येत आहेत. देशातील ऑनलाईन सोन्याचा व्यवसाय येत्या काही वर्षांत आणखी वाढणार, असं तज्ज्ञांचं मत आहे. ते असंही मानतात की, थेट स्टोरअरमध्ये जाऊन सोनं खरेदी करण्याच्या तुलनेत ऑनलाईन सोनं खरेदी करणं हा देखील एक चांगला गुंतवणूकची पर्याय असल्याने भविष्यात ऑनलाइन सोनं खरेदी वाढू शकते. ऑनलाइन सोने खरेदी करणे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त आहे. यामुळेच सणासुदीच्या हंगामापूर्वीच बरेच लोक ऑनलाईन सोने खरेदीकडे आकर्षित झाले आहेत. सोन्याच्या किंमती कमी झाल्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर विक्रीचे प्रमाणही वाढले आहे.