सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा पार पडल्याच्या फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अ‍ॅन्टेलिया या अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी पारपडलेल्या राधिका व अनंत अंबानीच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहताना अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे अनंत अंबानीचे वजन पुन्हा कसे वाढले?

हा प्रश्न अनेकांना पडण्याचे कारण म्हणजे, काही वर्षांपूर्वी अनंत अंबानी यांचे वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र, आता त्याचे वजन खूप वाढल्याचे स्पष्टपणे दिसत होत. तर अनेकांना त्याचा आताचा लूक पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वी IPL सामन्यादरम्यान अनंत अंबानी एका सोफ्यावर बसून क्रिकेटचा सामना पाहत होता.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

त्यावेळचे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याच्या लठ्ठपणावर अनेकांनी त्याला ट्रोल करणारी मीम्सही बनवली होती. त्यानंतर, प्रशिक्षक विनोद चन्ना यांच्या मार्गदर्शनाने त्याने आहारावर नियंत्रण आणि व्यायामाच्या मदतीने सुमारे १०८ किलो वजन कमी केले होते. त्याने वजन कमी केल्यानंतरचा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर त्याने घेतलेल्या कष्टाचे अनेकांनी कौतुकही केलं होते.

अनंतने वजन कमी कसं केलं?

अनंत वजन कमी करण्यासाठी दररोज सुमारे ५ तास व्यायाम करायचा, ज्यामध्ये २० किलोमीटर चालणे आणि योगासनांचा समावेश होता. अनंत हेल्दी डाएटमध्ये कमी कार्ब, हाय फायबर फूडसोबत ताजी फळे आणि भाज्या खात खायचा, याशिवाय त्यांनी तेलकट आणि गोड पदार्थ खाणेही त्याने टाळले होते. नंतने व्यायाम केल्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाल्याच अनेकांना जाणवलं होतं.

अनंत अंबानीची स्लिम फिगर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. कारण इतके वजन कमी करणे सोपं नाही. खूप कठीण वाटणारी गोष्ट अनंतने आपल्या मेहनतीने शक्य करून दाखवली होती. यामुळे आधी त्याला ट्रोल करणारेच त्याचे कौतुक करत होते. मात्र, आता पुन्हा त्याचे शरीर पहिल्यासारखे जाड झाले आहे.

कशामुळे वाढले वजन?

हेही वाचा- लटकण्याचा व्यायाम केल्याने खरंच उंची वाढते का? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, वजन कमी केल्यानंतर ते मेंटेन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर ते मेंटेन नाही केलं तर तुम्ही पुन्हा जाड होऊ शकता. त्यामुळे वजन कमी झाल्यानंतर तेलकट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ शकतो असा विचार करणं अयोग्य आहे. शिवाय वजन कमी झालं तरी व्यायाम सुरु ठेवायला हवा अन्यथा आधीची सर्व मेहनत वाया जाऊ शकते.

वजन कमी केल्यानंतरही ‘या’ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे –

वजन कमी झाल्यानंतर भूक हार्मोन वाढतो, तर स्नायू कमी झाल्यामुळे मेटाबॉलिज्म मंदावतो, त्यानंतर तुम्ही कमी अन्न खाल्ले तरी वजन वाढण्याची शक्यता असते. टीन एजमध्ये डाएटिंग केल्याने भविष्यात लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. म्हणूनच वजन कमी करूनही हेल्दी आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)