लहान मुलांपासून तरूण आणि वृद्धापर्यंत अनेकजण घोरत असतात. त्यात घोरणे सध्याच्या काळात सर्वात सामान्य होत चालले आहे. दरम्यान जेव्हा घशाचा मागचा भाग अरुंद होतो आणि ऑक्सिजन त्या मार्गावरून जातो तेव्हा आजूबाजूच्या ऊती कंपन करू लागतात. तेव्हा तुम्ही झोपेत घोरू लागतात. तथापि, घोरणार्‍या व्यक्तीला हे स्वतःहून कळू शकत नाही. पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची झोप मात्र भंग पावते.

काही लोकं घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात, तज्ञांच्या मते या समस्येकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला जास्त घोरायला येत असेल तर तुम्ही यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करून घोरण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

या घरगुती उपायांनी करा घोरण्याच्या समस्येपासून सुटका:

लहान वेलची

साधारणपणे, लहान वेलचीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो परंतु त्याच वेळी ती अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यास प्रभावी आहे. घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वेलची पावडर प्रभावी ठरू शकते. यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा वेलची पावडर टाकून सेवन करा. या पद्धतीचा नियमित अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

देशी तूप

घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट देसी तुपाचे काही थेंब नाकात टाका. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.

लसूण

लसूण खाल्ल्याने घोरण्याच्या समस्येवरही मात करता येते. यासाठी तुम्ही तुमच्या भाजीमध्ये लसूण घालून सेवन करू शकता. आहारात लसणाचा समावेश केल्याने घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.