वजन कमी करण्यासाठी करा ‘ही’ योग आसन!

वजन कमी करण्याचा जिम किंवा अन्य गोष्टींपेक्षाही साधा सोप्पा मार्ग म्हणजे योग आसन. नियमितपणे योगासने केल्यास वजन कमी होऊ शकते.

yoga poses for weight loss
वजन कमी करण्याचा सोप्पा मार्ग

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये अनेकांचं वजन वाढत आहे. वजन कसं कमी करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. कोणतेही माहीत नसलेले, आपल्या शरीरावर दुष्परिणाम करणारे मार्ग अवलंबण्यापेक्षा खूप आधी पासून चालत आलेले योग आसन नक्की करा. वजन कमी करण्यासाठी रोज आपण सूर्य नमस्कार जरी घातला तरी देखील फरक पडू शकतो. यामुळे फक्त वजन कमी होते असं नाही तर शरीर फिट होण्यास मदत होते, आपली चीड चीड कमी होते. योगासन केल्यामुळे आपल्या अनेक शाररीक समस्याही कमी होण्यास मदत होते. आपल्या जीवनात योगाभ्यास करून थोडा बदल घडवणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कोणती आसने करू शकता याबद्दल जाणून घेऊ.

सर्वंगासन

आपल्याला स्पॉन्डिलायसिस किंवा मानेचा काही त्रास नसल्यास हे आसन आवर्जून करा. खांदावर उभ राहिल्यामुळे आपल्या हनुवटीच्या विरूद्ध छातीत दाबली जाते आणि थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. हे पाचक, रक्ताभिसरण, लिम्फॅटिक, अंतःस्रावी आणि मज्जासंस्था संतुलित करते. ही पोज शांतता आणि संयम सुधारण्यास देखील मदत करते. हे आसन वाढीव ताण कमी करण्यास मदत करते आणि आपल्या शरीरास अशा परजीवांच्या बाबतीत बदलण्यास अनुमती देते त्यामुळे तुम्ही  सहज वजन कमी करू शकता. आपण योग्य मार्गदर्शन घेऊन सराव करत असल्याची खात्री करा.

धनुरासन

आपल्या पोटावर झोपा आणि आपले गुडघे वाकवून आपल्या पायाच्या टोकाला हळू पुढे करत वरच्या बाजूने पकडा. यानंतर हळुवारपणे स्वत: ला वरच्या बाजूस खेचा आणि जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत पूर्ण श्वास घ्या. या आसनमुळे वजन कमी होण्यास तर मदत होतोच पंरतु त्यासोबतच हार्मोनल संतुलन सुधारते, श्वासोच्छ्वास सुधारते आणि रक्ताभिसरण देखील सुधारते.

त्रिकोणासन

योगाचा सराव करण्यासाठी सर्वात सुरक्षित आसन आहे. उभं राहून आपले पाय पसरून आपल्या पायांमध्ये योग्य ते अंतर तयार करा. यामुळे आपल्या पायांच्यामध्ये त्रिकोण तयार होईल. आपला उजवा पाय बाहेरच्या दिशेने हलका बाहेर काढा. आपला उजवा हात आपल्या उजव्या पायावर ठेवा. आपला डावा हात डोकं खाली वाकून उंच करा आणि उजवीकडे वळा. खूप खाली जाऊ नका. आपली छाती ओपन राहील याची खात्री करा. बरीच लोकांची हे आसन करतांना होणारी चूक म्हणजे छाती आकडून घेणे, छाती ओपन राहणे गरजेचे आहे. त्रिकोनासनामुळे पचनक्रिया सुधारते, चांगली भूक लागण्यास मदत होते आणि आपली मज्जासंस्था संतुलित करते. नियमित सराव केल्याने आपल्या पोटावरील, कंबरेवरील आणि पार्श्वभागावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

नौकासन

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम योग आसन आहे. आपले पाय पसरून बसा. मांडीच्या बाजूने हळूवारपणे आपले पाय वरती घेण्यास सुरुवात करा. याच वेळी ताठ बसा मणका सरळ ठेवा. हलकेसे पाय आपल्या शरीराच्या दिशेने आणा. एखाद्या बोट प्रमाणे ही पोझ तयार झाली पाहिजे. यादरम्यान हळू श्वास घ्या. आपल्या पाठीवर ताण येणार नाही याची खात्री करा. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ही पोझ धरून ठेवा. नंतर पुन्हा काही वेळाने करा. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Try this easy yoga asanas for weight loss ttg