scorecardresearch

झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात? जाणून घ्या ५ सोप्या टिप्स

जर तुम्ही वेगाने वजन कमी करू इच्छित असाल तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात? जाणून घ्या ५ सोप्या टिप्स
झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स (Photo : Pexels)
आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे कि योग्य मार्गाने वजन कमी करणं हे काही सोपं काम नाही. ध्येय गाठण्यासाठी आपल्या काही जीवनशैलीतील बदलांच्या जोडीने मोठ्या प्रमाणात शिस्त आणि ठाम निश्चय आवश्यक आहे. मात्र, अनेकजण झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, हा प्रकार बहुतांश वेळा शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो. पण तरीही जर तुम्ही वेगाने वजन कमी करू इच्छित असाल तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. जेणेकरून या प्रवासात तुमच्या शरीराचं आणि आरोग्याचं नुकसान होणार नाही. आहारतज्ज्ञ रुचिता बत्रा यांनी अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स आहेत.

झटपट वजन कमी करणाऱ्यांसाठी ५ सोप्या टिप्स

  • झोप : झोप हे आपल्या मनाचे रीबूट बटण आहे. बत्रा म्हणाल्या कि, झोपेची कमतरता चयापचय कमी करते आणि हार्मोन्समध्ये अडथळा आणते. पुढे पुरेशी झोप न घेणं तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हानी पोहोचवू शकते.
  • हायड्रेशन : वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. कारण, पाणी तुम्हाला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते.
  • जेवणातील अंतर : खोट्या किंवा फसव्या भुकेपासून दूर रहा. तुमच्या वैद्यकीय स्थितीनुसार तुमच्या जेवणांमध्ये अंतर ठेवा.
  • साखर आणि तळलेले अन्न : तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात आहात म्हणून तुम्हाला तुमचं आवडतं अन्न सोडण्याची गरज नाही. परंतु, आपलं लक्ष्य साध्य होईपर्यंत साखर आणि तळलेले अन्नपदार्थांपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे.
  • व्यायाम आणि शारीरिक हालचाली : जलद वजन कमी करण्याच्या परिणामांसाठी आपण आपल्या व्यायामाच्या पातळीची तीव्रता वाढवणं सुनिश्चित करा. जरी तुम्ही दररोज व्यायाम करत नसाल, तरी तुम्ही शक्य तितके शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत आहात याची खात्री करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by ruchita |dietician| (@ruchitabatra_nutritionist)

वजन कमी करण्यासाठी खरंतर पुरेसा वेळ, सातत्य आणि शिस्त महत्त्वाची आहे. मात्र, विशिष्ट दिवसांमध्येच वजन कमी करायचं असा तुमचा निश्चय असेल तर वरील टिप्स जरूर लक्षात घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-08-2021 at 13:12 IST

संबंधित बातम्या