तुळशीचे रोप बहुतेक घरांमध्ये आढळते. त्यामागे धार्मिक कारणांप्रमाणेच आयुर्वेदातही तुळशीच्या रोपाला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला आयुर्वेदात देखील फार महत्व आहे. तुळस अनेक आजारांवर औषधी आहे. वास्तुशास्त्रात अनेक झाडे आहेत, जी घरातील दोष दूर करण्यास मदत करतात. घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा मिळते, असंही सांगण्यात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


तुळशीचे रोप अचानक सुकणे हे घरात संकट येण्याचे संकेत असं मानलं जातं. याचा अर्थ भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावर कोपले आहेत. वास्तूनुसार तुळशीची पाने अचानक पडणे देखील अशुभ मानले जाते. पितृदोषामुळे अनेक वेळा तुळशीचे रोप सुकते, त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असंही मानलं जातं की घरात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून होणारे भांडण हे पितृदोषाचे कारण असू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi plant is beneficial for health know the correct position of this plant vsk
First published on: 12-03-2022 at 17:24 IST