दिवाळी संपली तरी आनंदव्रताची सांगता होत नसते. कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवानंतर सर्वाना प्रतिक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची…आनंदाचे कवडसे तुळशी विवाहापर्यंत बागडत राहतात. घरात तुळशीच्या लग्नाने एका वेगळ्याच चैतन्याची अनुभूती येते आणि अवतरणा-या आल्हाददायक थंडीची साथ मिळून वेगळीच रम्यता सर्वदूर पसरते. कन्ये स्वरूपात तुळशीचं साक्षात श्रीकृष्णाशी विवाह लावून देताना कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहात नाही. घराप्रमाणेच सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी अगदी दिवाळीपासूनच तयारीला लागतात. पण गेली दोन वर्षे कोणतेच सण-उत्सवाच्या उत्साहाला थोडं आवरतं घ्यावं लागलं होतं. यंदाच्या वर्षी सुद्धा करोनाचं सावट अजुन काही शमलेलं नाही. म्हणून आधीसारखं उत्सवीरूपात तुळशी विवाह साजरा करणं अवघड असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, जवळच्या मित्र-मैत्रिणींनी व्हॉट्सअॅपवरून तुळशी विवाहाचे शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही हा सण साजरा करू शकता. त्यासाठीच घेऊन आलोय काही हटके तुळशी विवाहाच्या शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअॅप स्टेटस, चारोळ्या…नक्की शेअर करा.




Tulsi Vivah Wishes In Marathi | तुळशी विवाह शुभेच्छा
अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणि डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
सॉरी Friends, I Am Very सॉरी..!! लग्न इतक्या गडबडीत ठरलं, आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!! त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय, ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत पत्रिका पोहचो न पोहचो तरी हेच निमंत्रण समजुन तुम्ही या…. लग्नाची तारीख आहे १५ नोव्हेंबर २०२१, संध्याकाळीः ७.२० वा.. . . . . आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!
आज सजली तुळस शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात उभारला आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी
आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर,
पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
??तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!??
सर्वात सुंदर तो नजारा असेल,
जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल,
प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल,
जेव्हा तुळशीचा विवाह होईल.
तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना
मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह
साजरा करुया सर्वजण
??तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!??
नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके
??तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!??
ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गसमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदाचे, मांगल्याचे पावन
पर्व तुळशी विवाहाचे
??तुळशी विवाहाच्या
मंगलमयी शुभेच्छा!??
तुळशीविना ज्याचे घर
ते तव जाणावे अघोर
??तुळशीच्या लग्नाचा
हार्दिक शुभेच्छा!??
??सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!??
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
??तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!?
आज आनंदी आनंद झाला
तुळशी विवाहाचा
दिन हा जवळ आला
??तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!??
Tulsi Vivah Charolya | तुळशी विवाह चारोळ्या
अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि
झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज आहे
??तुळशी विवाहाचा दिवस!??
दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
आनंदाचा आणि मांगल्याचा
तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या
??लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न
??तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!??
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
???तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???
आणखी वाचा : Tulsi Vivah 2021 Vidhi and Muhurt: जाणून घ्या तुळशी विवाहाची सोपी पद्धत, संपूर्ण विधी, विवाह मुहूर्त
Tulsi Vivah Status In Marathi | तुळशी विवाह स्टेटस
तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला,
आज आहे फक्त आनंदी आनंद
??तुळशी विवाहाच्या
शुभेच्छा!??
हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
??तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!??
सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..
लग्नाची तारीख 15-11-2021 आहे, संध्याकाळीः 7:30 वा…
तुळशीविना ज्याचे घर
ते तव जाणावे अघोर
???तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!???
हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
???तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!???
थोड्याचा वेळात कृष्णाच्या आणि तुळशीच्या लग्नाला सुरूवात होत आहे… तरी तुळशीच्या मामा-मामीने….ऊसाच्या मंडपात तुळशीला घेऊन हजर रहावे…तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
???आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!???
आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां..
लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…
सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न
???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???
शुभ सकाळ शुभ दिवस
???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!