Premium

Bank Holiday in December 2021: महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये बँकांना सहा दिवस सुट्टी; २५ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार सहा दिवस सुट्टी आहे तर २५ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

Bank Hoilday in December
डिसेंबरमध्ये बँकांना सहा दिवस सुट्टी (प्रातिनिधिक फोटो )

Bank Hoilday in December 2021: बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात ६ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

( हे ही वाचा: Reliance Jio Plans Hike: जिओ रिलायन्सच्या वापरकर्त्यांना मोठा झटका; ४८० रुपयांपर्यंत प्लॅन महागले, पाहा नवीन दर )

सुट्ट्यांची यादी

५ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

११ डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

१२ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

१९ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

( हे ही वाचा: 2022 Rashifal: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी २०२२ वर्ष असणार आहे खास, नोकरीत प्रचंड यश मिळण्याची शक्यता )

२५ डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)

२६ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upcoming bank holiday alert detailed list of how many bank holidays in december 2021 ttg

First published on: 29-11-2021 at 11:01 IST
Next Story
तोंडाच्या दुर्गंधीमुळे कोणाशीही बोलता येत नाही? जाणून घ्या तज्ञांकडून ‘हे’ खास उपाय