यूरिक ॲसिडची पातळी वाढणे एक असा आजार आहे जो नेहमी ४० वर्षांच्या वयानंतर होते. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहारामुळे कमी वयात लोकांना युरिक ॲसिडचा त्रास होत आहे. युरिक ॲसिड हे एक रसायन आहे जे आपल्या सर्वांच्या शरीरात तयार होते. हे रसायन आपल्या शरीरातील टाकाऊ घटक असतात जे मुत्रपिंड प्रक्रिया करून लघवीवाटे शरीराबाहेर टाकते. युरिक ॲसिड तयार होणे ही चिंतेची बाब नाही पण त्याची पातळी वाढणे किंवा शरीरात साचणे हे धोकादायक ठरू शकते.
आहारातून प्युरिन तयार करणाऱ्या घटकांचे अधिक सेवन केल्यास शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढू लागते. कित्येकदा मुत्रपिंड या वाढलेल्या ॲसिडला बाहेर काढू शकत नाही आणि ते शरीरात साचते. युरिक ॲसिडची पातळी वाढल्याने त्याचे खड्यांमध्ये रुपांतर होते जे सांध्यामध्ये साचतात. युरिक ॲसिड वाढल्याने पायांमध्ये आणि सांध्यामध्ये वेदना होऊ लागते.
तुम्ही देखील युरिक ॲसिड वाढण्यामुळे त्रस्त असाल तर एक आयुर्वेदिक उपाय वापरू शकता. बाबा रामदेव याच्या मते, वाढलेली युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस अत्यंत गुणकारी ठरतो. दुधी भोपळ्याचा रस युरिक ॲसिडची पातळी कशी निंयत्रणात ठेवतो आणि तो कसा तयार करावा हे जाणून घ्या…
भोपळ्याचा रस युरिक ॲसिड कसे नियंत्रित करतो?
भोपळ्याची भाजी चवीला स्वादिष्ट आहेच पण आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. या भाजीचा वापर करून त्याचा रस तयार केल्यास युरिक ॲसिड नियंत्रित करू शकता. व्हिटॅमिन बी आणि सीने समृद्ध असलेली ही भाजी पचन सुधारते. दुधी भोपळ्याचा रस भूक शांत करतो आणि लठ्ठपणा देखील नियंत्रणात ठेवतो. हा रस प्यायल्यास पोटाच्या कित्येक समस्या, भूक न लागणे, यकृत(लिव्हर) आणि मूत्रपिंड(किडनी) संबधीत समस्यांवर देखील बऱ्या करतो. युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर दुधी भोपळ्याचा रस रोज सकाळी प्या.
दुधीभोपळ्याचा रस कसा तयार करावा?
दुधी भोपळ्याचा रस निर्माण करण्यासाठी एक दुधी भोपळा घ्या आणि स्वच्छ धुवा. रस तयार करण्याआधी भोपळ्याची चव कडू आहे का? ते तपासून घ्या.
धुतल्यानंतर भोपळ्याचे छोटे छोटे काप करा आणि ज्युसरमध्ये टाकून वाटून घ्या.
त्यानंतर तयार ज्यूस एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा
जर भोपळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.
टिप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
