Uric acid : शरीरात प्युरिन नावाचे प्रथिन तुटले की, युरिक अॅसिड तयार होते. या रसायनाचे प्रमाण जास्त झाल्यास रुग्णांना असह्य सांधेदुखी आणि सूज, असा त्रास होऊ शकतो. युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्यांमध्ये संधिवात होण्याचा धोकादेखील जास्त असतो. त्यामुळे मूत्रपिंडांशच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याची त्यांची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत या रुग्णांसाठी कोथिंबीर खाणे फायदेशीर ठरू शकते. कसे ते जाणून घेऊया.
धणे युरिक अॅसिड नियंत्रित करते: हिरव्या धणे म्हणजे कोथिंबिरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यात मूत्रवर्धक गुणधर्मदेखील असतात, जे मूत्रपिंडांना सक्रियपणे कार्य करण्यास मदत करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, धणे खाल्ल्याने मूत्रपिंडातील खडे मूत्रमार्गे बाहेर जाण्यासदेखील मदत होते.
सांधेदुखीपासून आराम: कोथिंबीर खाल्ल्याने यकृताचे कार्यदेखील वाढते. त्यामुळे यकृत शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे मूत्रपिंडांवरील भार कमी होतो. कोथिंबिरीमध्ये दाहकविरोधी गुणधर्मदेखील असतात, जे वाढत्या युरिक ॲसिडच्या पातळीमुळे येणारी सूज आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकतात.
रक्तातील साखर नियंत्रित करते : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यात कोथिंबिरीची पाने महत्त्वाची भूमिका बजावतात. कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, कोथिंबिरीच्या पानांचे सेवन टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय कोथिंबिरीच्या पानांचे सेवन पचनसंस्था मजबूत करते.
हृदयासाठी फायदेशीर : शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून, ते केवळ वजन कमी करण्यास मदत करीत नाही, तर कोथिंबिरीची पाने हृदय सक्षम ठेवण्यासदेखील हातभार लावतात.
कसे सेवन करावे? : तुम्ही भाज्या आणि मसूर यांसारख्या पदार्थांमध्ये कोथिंबिरीची पाने वापरू शकता. कोथिंबिरीच्या पानांची चटणीदेखील चविष्ट असते. कोथिंबिरीच्या पानांपासून बनवलेला रसदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
