Urine Foam Kidney Damage: काही लोकांच्या लघवीचा रंग बदलतो, तर काहींना लघवी करताना जळजळ होते. कधी कधी लघवी करताना फेसही येतो. पण जर तुमच्या लघवीत वारंवार फेस दिसत असेल आणि तो काही सेकंदांत निघून जात नसेल, तर हे दुर्लक्ष करण्यायोग्य साधं लक्षण नाही.

तज्ज्ञांच्या मते, लघवीत फेस येणं हे कधी कधी किडनीच्या गंभीर समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. जेव्हा किडनी रक्त नीटपणे स्वच्छ करू शकत नाही, तेव्हा त्यातील प्रथिनं लघवीतून बाहेर फेकली जातात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत प्रोटिन्युरिया, असं म्हणतात.

लघवीत फेस येणं म्हणजेच किडनी खराब झाली आहे, असं नेहमीच असतं, असं नाही; पण तो एक इशाराही असू शकतो. अनेकदा जोरात लघवी होणं, शरीरात पाण्याची कमतरता किंवा जास्त प्रथिनं असलेला आहार यांमुळे तात्पुरता फेस येऊ शकतो.

मात्र, ही समस्या बराच काळ टिकून राहिली, तर ती गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ लघवीत फेस दिसत राहणं म्हणजे किडनीची रक्त गाळण्याची क्षमता कमी होत असल्याचं लक्षण असू शकतं.

किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे

लघवीत फेस येणं हा फक्त किडनी खराब होण्याबाबतचाच नाही, तर इतर आजारांसंदर्भातलाही इशारा असू शकतो. अनेकदा लघवीत जास्त फेस दिसणं हे लक्षण डायबेटीस आणि उच्च रक्तदाबाकडेही लक्ष वेधू शकतं.

लघवीत फेस येणं हे फक्त किडनीच नाही, तर इतर आजारांचाही इशारा असू शकतो. अनेकदा लघवीत जास्त फेस दिसणं हे डायबेटीस आणि उच्च रक्तदाबाकडेही लक्ष वेधू शकतं.

त्याशिवाय हृदयाशी संबंधित समस्या, गर्भधारणा, ताणतणाव आणि लघवीच्या संसर्गातही लघवीत जास्त फेस दिसू शकतो. तज्ज्ञ सांगतात की शरीरात एखादा गंभीर आजार वाढत असेल, तर त्याचा पहिला इशारा अनेकदा लघवीतूनच मिळतो. म्हणूनच लघवी फेसाळ दिसणं, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होणं, तीव्र दुर्गंधी येणं, जळजळ होणं किंवा लघवीत रक्त दिसणं, अशी लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.