बरेचजण पार्लरमध्ये चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी जातात. यासाठी ही लोक जास्त पैसे देखील मोजतात. या रासायनिक उत्पादनांचा आपल्या चेहऱ्यावर प्रभाव हा काहीवेळच असतो. तसंच या रासायनिक प्रसाधनांचे साइड्स इफेक्ट्स देखील आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. त्यामुळे आपल्या पेक्षा मोठी माणसे आपल्याला घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात. आपण आपल्या आजीकडून नेहमी चेहऱ्यावर मलाई लावण्याचा सल्ला घेतलाच असेल. ते देखील चेहऱ्यावर घरगुती मलाईचा वापर बऱ्याच काळापासून करत आहेत. त्वचा हायड्रेटेड ठेवणे कधीही चांगले असते. तर तुम्ही चेहऱ्यावरील मंदपणा आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी घरगुती फ्रेश मलाई देखील वापरू शकता. तर फ्रेश मलाईसह फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.

फ्रेश मलाईसह फेस पॅक कसा बनवायचा?

१) मलाई आणि बदाम

हा फेस पॅक बनवण्यासाठी बदामाचा बारीक लगदा करून घ्या. नंतर त्यात एक चमचा फ्रेश मलाई मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर क्लींजरने चेहरा स्वच्छ करा आणि हा फेस मास्क चेहऱ्याला लावा. १५मिनिटांपर्यंत हा फेस पॅक चेहऱ्यावर राहू द्या. नंतर या फेस पॅकवर थोडेसे पाणी स्प्रे करा आणि गोलाकार हाताने चेहऱ्यावरील मास्क काढा. नंतर मास्क कोमट पाण्याने काढून टाका.

Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

( हे ही वाचा: Tamarind For Skin Care: सुंदर त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ पद्धतींनी करा चिंचेचा वापर; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

फायदे

फ्रेश मलाई आणि बदामाचा लगदा तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतो तसंच चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे काढून टाकतो. हे फेस मास्क त्वचेला शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्त्वे प्रदान करते. ज्यामुळे निस्तेज आणि निर्जीव त्वचा चांगली होते.

२) मलई आणि संत्रा-लिंबाचा रस

हा फेस मास्क तयार करण्यासाठी, एक चमचा संत्र्याचा आणि लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि हा फेसमास्क चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर फेस मास्क लावत असताना नाक, तोंडाच्या कोपऱ्यात आणि डोळ्याभोवती लावणे टाळा. नंतर हा फेस मास्क ३० मिनिटे चेहऱ्यावर असाच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.आठवड्यातून हा फेस मास्क दोनदा लावा.

( हे ही वाचा: Skin Care Tips: चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास होतोय? अशाप्रकारे घ्या काळजी)

फायदे

लिंबू आणि संत्री या दोन्हीमध्ये एंटी बैक्टीरियल आणि एंटीमाइक्रोबिअल गुणधर्म असतात. जे मुरुम आणि पिंपल्सपासून चेहऱ्याचे संरक्षण करतात. तसेच, हे रस क्रीम सोबत वापरल्यास, हा फेस मास्क लाइटनिंग एजंट म्हणून काम करतो, जो चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)