हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. कारण हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचेवर कोरडेपणा वाढतो. या कोरडेपणामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. याशिवाय हिवाळ्यात त्वचेवर तेलकट आणि कोरडे ठिपके देखील येऊ शकतात, म्हणूनच त्वचारोग तज्ञ हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेण्याचा सल्ला देतात. त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी लोणी खूप प्रभावी आहे.

सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी लोणी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेतील पिगमेंटेशन काढून टाकते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ई त्वचेतील कोलेजन राखण्यासाठी देखील प्रभावी आहे. कोलेजन हा एक प्रकारचा फायबर आहे, जो त्वचेवर सुरकुत्या दिसण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे त्वचा तरूण आणि सुंदर राहते.

ब्युटी प्रोडक्ट्समध्येही लोकं लोणी वापरतात. त्वचा तज्ञ याला नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणतात कारण ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते तसेच त्वचेवरील डाग दूर करते. तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये लोणीचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.

लोणीचा अश्या पद्धतीने करा वापरा

लोणीमध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल किंवा काही थेंब मध घाला. नंतर या तिन्ही गोष्टी एका घट्ट डब्यात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या पद्धतीचा नियमित अवलंब केल्याने तुमची कोरडी त्वचा देखील मुलायम होते.

लोणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते. लोणीमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला आतून बरे करते. यामध्ये असलेले फॉस्फोलिपिड्स त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील दूर करतात.

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करणे खूप गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्वचेच्या मृत पेशी जमा झाल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशा स्थितीत त्वचा नियमितपणे स्क्रब करणं खूप गरजेचं आहे.