Hair Care: केसांना चमकदार बनविण्यासाठी ‘या’ हेअर मास्कचा वापर करा; जाणून घ्या कसे बनवायचे

त्वचेप्रमाणेच केसांकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या सहज बनवल्या जाणाऱ्या हेअर पॅकच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवू शकता.

Use these hair mask for shiny hair Learn how to make
केस चमकदार बनविण्यासाठी या हेअर मास्कचा वापर करा( फोटो : file photo)

Hair Care: त्वचेप्रमाणे केसांचीही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आजूबाजूला असणाऱ्या प्रदूषणामुळे केस खराब होतात. त्यामुळे कोंडा, खाज सुटणे, केस गळणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसंच केसांची नीट काळजी न घेतल्याने केसांची अवस्था बिकट होते आणि त्यामधील चमक देखील निघून जाते. म्हणूनच केसांची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क वापरू शकता. येथे आम्ही केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्कबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे केसांची समस्या सहज दूर होऊ शकेल. तसंच तुमचे केस चमकदार देखील होतील.

१) कोंड्यासाठी हेअर मास्क

केसांमधील कोंडा ही एक अतिशय सामान्य समस्या आहे जी कोणत्याही महिन्यात होऊ शकते. बहुतेक ९०% महिला या कोंड्यामुळे त्रस्त असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी केसांना लावण्याचा एक हेअर मास्क जाणून घ्या. यासाठी एक वाटी मेथी दाणे घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर हिबिस्कसची काही फुले घ्या आणि त्याची पेस्ट बनवा आणि त्यात आधी बनवलेली मेथीची पेस्ट आणि सोबत खोबरेल तेल मिसळा. आता हा मास्क टाळूवर लावा. काही वेळ असंच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.

( हे ही वाचा: Hair Care: केसांची काळजी घेण्यासाठी स्कॅल्प फेशियल करा; जाणून घ्या ते कसे करावे)

२) चमकदार केसांसाठी हेअर मास्क

केसांची चमक वाढवण्यासाठी, हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊया. यासाठी एक पिकलेले केळं घ्या आणि त्याला चांगले मॅश करा. त्यानंतर त्यात १ अंड, लिंबाचा रस आणि व्हिटॅमिन के कॅप्सूल घाला. नंतर ही बनवलेली पेस्ट केसांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या. नंतर केस कोमट पाण्याने धुवा. तुमचे केस चमकदार होतील.

पाहा व्हिडीओ –

३) सॉफ्ट केसांसाठी हेअर मास्क

तुमचे केस जर रफ झाले असतील तर त्यांना सॉफ्ट बनविण्यासाठी हा हेअर मास्क फायदेशीर ठरेल. हा मास्क बनविण्यासाठी दही घ्या आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. हे दोन्ही चांगले एकत्र मिसळा आणि नंतर हा पॅक तुमच्या केसांना लावा, थोडा वेळ ठेवल्यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

( हे ही वाचा: पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ तेलांचा वापर करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

५) केस कंडिशनिंगसाठी

केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनर लावण्यासाठी अंड्यामध्ये बदाम तेल, लिंबाचा रस, ग्लिसरीन घेऊन चांगले एकत्र मिसळा आणि नंतर केसांना लावा आणि चांगले झाकून ठेवा. हा मास्क १५ मिनिटे तुमच्या केसांवर तसाच राहू द्या. नंतर काही वेळाने केस धुवा. तुम्हाला चांगला फायदा मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use these hair mask for shiny hair learn how to make gps

Next Story
Hair Care: केसांची काळजी घेण्यासाठी स्कॅल्प फेशियल करा; जाणून घ्या ते कसे करावे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी