Hair Care Tips : पातळ केसांच्या समस्येवर 'हे' उपाय करून पाहा; लगेच दिसेल फरक | Use these helpful tips to take care of thin hair | Loksatta

Hair Care Tips : पातळ केसांच्या समस्येवर ‘हे’ उपाय करून पाहा; लगेच दिसेल फरक

काही जणांचे केस पातळ असतात, त्यामुळे त्यांना कोणतीही हेअर स्टाईल नीट करता येत नाही. पातळ केसांची काळजी घेण्यासाठी हे उपाय करून पाहा.

Hair Care Tips : पातळ केसांच्या समस्येवर ‘हे’ उपाय करून पाहा; लगेच दिसेल फरक
Photo : Freepik

केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण तरीही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासुन मजबुत करणे गरजेचे असते. तर काहीजण पातळ केसांच्या समस्येने त्रस्त असतात.

बऱ्याच जणांना लहानपणापासून केस पातळ असण्याची समस्या असते. पातळ केसांची अनेक कारणे असू शकतात. धूळ, माती, प्रदूषण यांसारख्या कारणाबरोबर हार्मोनल बदल आणि जीवनशैलीचाही केसांवर परिणाम होतो. पातळ केस असल्यास कोणतीही हेअर स्टाईल करताना अडचण येते. जर पातळ केसांमधून टाळू दिसू लागला, तर टक्कल पडेल का अशी भीती वाटते. यावर उपाय म्हणजे पातळ केसांची योग्यरित्या काळजी घेणे यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या जाणून घ्या.

Navratri Diet Tips : मधूमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

हीटिंग टूल्सचा वापर
जर तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्ही त्यांना स्टाईल करण्यासाठी दररोज हीटिंग टूल्स वापरू नका. हीटिंग टूल्समुळे तुमचे केस जास्त कोरडे होतील, तसेच यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

स्ट्रेट केस
पातळ केस असलेल्या महिलांनी केस स्ट्रेट करणे देखील टाळावे. कारण स्ट्रेट केस जास्त पातळ दिसतात.

जेलयुक्त प्रोडक्ट टाळा
पातळ केसांवर जेलयुक्त स्प्रे वापरणे टाळा. यामुळे केस अधिक पातळ दिसु शकतात.

कंडिशनर लावणे टाळा
केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरऐवजी केस तसेच राहूद्या. जर तुम्ही केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरत असाल तर तुमचे केस आणखी पातळ दिसतील. शॅम्पू केल्यानंतर केस मोकळे सोडू शकता, त्यामुळे डोक्यावरील केस अधिक दाट आणि सुंदर दिसतात.

Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

योग्य प्रोडक्ट निवडा
जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणे टाळावे. केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे केस गळू शकतात. तुमच्या केसांसाठी योग्य असणारी उत्पादनेच निवडा. केस तेलकट किंवा कोरडे असल्यास त्या प्रकारानुसार प्रोडक्ट खरेदी करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Navratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या

संबंधित बातम्या

‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश!
‘ही’ शारीरिक लक्षणे आढळल्यास तुम्ही असू शकता नैराश्यात
ताप आलाय? मग ‘ही’ पथ्ये नक्की पाळा
करोनावर मात केल्यावर घ्या आरोग्याची काळजी: करा सोप्पा व्यायाम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी