महिलांच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस त्यांना अनेकदा त्रास देतात. हे नको असलेले केस एकतर अनुवांशिक असतात किंवा ज्या महिलांना पीसीओडीची समस्या असते त्यांच्या चेहऱ्यावर केस येऊ लागतात. या समस्येमुळे बऱ्याच महिला हैराण असतात आणि या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. चेहऱ्यावरील हे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करावी लागते किंवा घरीच रेजरचा वापर करून हे केस काढावे लागतात. परंतु घरगुती उपायांचा वापर करूनही तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस काढू शकता.

Home Remedies to Remove Unwanted Facial Hair : चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी घरगुती उपाय

बेसन आणि तुरटी :

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. एका वाटीमध्ये बेसन घ्या, त्यामध्ये अर्धा चमचा तुरटी पावडर घ्या. यामध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी. चेहऱ्याच्या ज्या भागावर नको असलेले केस आहेत त्या भागात ही पेस्ट लावावी. १० मिनिट ठेवून हात ओले करून चेहऱ्यावर चोळावेत. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करू नये.

Health Tips : त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे Tea Tree oil; ‘या’ समस्यांपासून करते रक्षण

ओट्स आणि केळे

एक केळे घेऊन त्यामध्ये तीन चमचे ओटमील मिसळावे. आता ही पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार मसाज करावा. असे केल्याने चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून सुटका होऊ शकते. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करावा.

गव्हाचे पीठ

एक चमचा गव्हाचे न चाळलेले पीठ घ्यावे. यामध्ये अर्धा चमचा मुलेठी पावडर आणि चिमूटभर कस्तुरी हळद मिसळावी. कस्तुरी हळद नसल्यास घरातील हळदीचाही वापर करू शकता. यामध्ये राईच्या तेलाचे काही थेंब टाकावे. नारळाच्या तेलाचा किंवा ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्यावर नको असलेले केस असतील त्या भागावर ही पेस्ट लावावी. १५ मिनिटानंतर ही पेस्ट धुवावी. याचा रोज वापर करू शकता.

कच्ची पपई

पपई खाण्यात जितकी फायदेशीर आहे तितकेच ते चेहऱ्यावर लावण्याचेही फायदे आहेत. कच्च्या पपईचा एक तुकडा घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करावा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा हळद मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक सुकल्यानंतर तो चोळून काढावा. यानंतर आपला चेहरा पाण्याने धुवावा. चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करू नये. आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करा.

Health Tips : मासिक पाळीच्या वेळी होतो पिंपल्सचा त्रास? ‘या’ टिप्सचा वापर करून दूर करा समस्या

लिंबू आणि मध

हा वॅक्सिंगसाठीचा एक पर्याय आहे. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करते. मधामध्ये लिंबू आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा एक्सफोलिएट होते आणि नको असलेले केस दूर होतात.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)