सणांच्या काळात प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. त्यात दिवाळी हा सण सगळ्यांचा आवडता सण, पाच दिवस रोजचा कामाचा ताण बाजुला ठेऊन कुटुंबाबरोबर मनसोक्त वेळ घालवण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. यातच नवीन वस्तुंची खरेदी, घराची साफसफाई, फराळ बनवण्याची गडबड या सगळ्यांमध्ये स्त्रियांना स्वतःसाठी वेगळा वेळ काढणे कठीण होते. त्यामुळे आजकाल अनेक स्त्रिया घरातच ब्लिच करतात. पण हा ब्लिच लावल्यानंतर काही वेळा चेहऱ्याच्या त्वचेवर पिंपल्स येणे, त्वचा लाल होणे अशी अडचण दिसू शकते. या समस्या भाऊ नयेत यासाठी ब्लिच करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.
ब्लिच करताना घ्या या गोष्टींची काळजी :

लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी

VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण

“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
- ब्लिच करताना योग्य प्रोडक्ट निवडा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ऑइल बेस्ड ब्लिचची निवड करा. यानुसार चेहऱ्याच्या प्रकारानुसार तुम्ही ब्लिचची निवड करू शकता.
- ब्लिच करण्यापुर्वी चेहरा थंड पाणी आणि माईल्ड फेसवॉशने नीट धुवून घ्या.
- घरात ब्लिच करत असताना ते मिश्रण योग्य प्रमाणात बनवने आवश्यक असते. त्यासाठी प्रोडक्टवर देण्यात आलेले मिश्रणाचे प्रमाण नीट वाचून त्यानुसार ब्लिच तयार करा.
- चेहऱ्यावरील ज्या भागात केस जास्त असतील त्या भागात ब्लिच जास्त लावा, तर ओठांजवळ कमी ब्लिच लावा. याशिवाय डोळ्यांजवळ ब्लिच लावणे टाळा.
- ब्लिच काढून टाकण्यापुर्वी चेहऱ्यावरील केस निघाले आहेत का हे एकदा तपासा.
- ब्लिच करून झाल्यानंतर स्किन इरिटेशन होऊ नये यासाठी चेहऱ्यावर फेसपॅक लावा. मुलतानी माती, गुलाब पाणी यांचा वापर केलेला फेसपॅक वापरू शकता.
- यानंतर चेहऱ्याला नीट मॉइश्चराइज करा.
- ब्लिच केल्यानंतर उन्हात जाणे टाळा. कारण त्यामुळे सनबर्न होऊ शकतो. या टिप्स तुम्हाला घरीच ब्लिच करण्यासाठी नक्की मार्गदर्शक ठरतील.