scorecardresearch

कोरड्या खोकल्याने त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपचार कराच; त्वरित मिळेल फायदा

कोरड्या खोकल्यावरील घरगुती उपचार जाणून घ्या

कोरड्या खोकल्याने त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपचार कराच; त्वरित मिळेल फायदा
प्रातिनिधिक फोटो

हवामानात थोडा जरी बदल झाला की त्याचा परिणाम लगेच शरीरावर झालेला दिसून येतो. त्यातच मान्सूनमध्ये हवामान बदलले तर सर्दी, खोकला, ताप या आजारांनी सर्वजण त्रस्त होतात. यामध्ये कोरडा खोकला अधिक त्रासदायक असतो. कारण यामध्ये सततच्या खोकल्याने पोट आणि आतडी दुखायला लागतात. यासाठी कितीही औषधे घेतली तरी कोरडा खोकला कमी होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला नक्की फायदा मिळू शकेल. हे घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय

मध

कोरड्या खोकल्यावर मध रामबाण उपाय आहे. मध घसा खवखवणे थांबवते आणि त्यासोबतच जर घशात काही संसर्ग झाला असेल तर तोही बरा करते.

गरम पाणी आणि मध

अर्धा ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्या. अशाप्रकारे मधाचे नियमित सेवन केल्याने कोरडा खोकला जाण्यास मदत होईल.

आणखी वाचा – Eating Disorder म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

आले आणि मीठ

आलेदेखील कोरड्या खोकल्यावर फायदेशीर उपाय आहे. यासाठी आल्याचा एक तुकडा ठेचा त्यावर चिमूटभर मीठ घाला. त्यानंतर हा आल्याचा तुकडा दाढेखाली ठेवा. त्याचा रस हळू हळू शरीरात जाऊ द्या. ५ मिनिटांपर्यंत ते तोंडात तसेच राहूद्या, त्यानंतर तो तुकडा काढून तोंड धुवून घ्या.

हळदीचे दुध

हळदीचे दूधदेखील कोरडा खोकला घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी १ ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. हे घरगुती उपाय वापरून कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या