Skin Care Tips : टॅनिंगमुळे चेहरा निस्तेज झालाय? तर ‘हे’ घरगुती उपाय वापरुन पाहाच

घरगुती उपाय वापरून टॅन दूर करता येऊ शकते.

Skin Care Tips : टॅनिंगमुळे चेहरा निस्तेज झालाय? तर ‘हे’ घरगुती उपाय वापरुन पाहाच
प्रातिनिधीक फोटो

युव्ही किरणांमुळे त्वचेवर टॅन जमा होतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पाय, गळा आणि चेहऱ्यावर टॅन जमा होते. त्यामुळे तेथील त्वचा काळी पडते.यासाठी योग्य ती काळजी घेणे आणि शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. काही वेळा अनेक प्रोडक्ट्स वापरून देखील टॅनिंग कमी होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून टॅन दूर करता येऊ शकते.

कोणते घरगुती उपाय वापरून आपण टॅनिंगपासून मुक्तता मिळवू शकतो जाणून घेऊया.

काकडीचा रस

काकडीच्या रसात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे हा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. तसेच त्वचेला मॉइस्चराइज ठेवण्यासाठी देखील हा रस उपयुक्त आहे. काकडीचा रस वापरून तुम्ही टॅनपासून मुक्तता मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काकडीच्या रसात लिंबू पिळावे लागेल. त्यानंतर हा रस चेहऱ्यावर वीस मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे टॅनपासून मुक्तता मिळेल आणि चेहऱ्याला थंडावा देखील मिळेल.

Skin Care Tips : चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मसाज; त्वचेला होईल फायदा

नारळाचे दूध

नारळाच्या दुधामुळे त्वचेला पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. तसेच ते त्वचेला हाइड्रेटेड ठेवते. टॅन दूर करण्यासाठी नारळाचे दूध उपयुक्त मानले जाते. यासाठी एका वाटीत नारळाचे दूध घ्या. हे दूध कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर हळुवारपणे लावा. सुकेपर्यंत हे चेहऱ्यावर असेच असू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या. यामुळे टॅन जाण्यास नक्की मदत मिळेल.

बेसन हळद आणि दुधाचा फेसपॅक

एका वाटीत दोन चमचे बेसन घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. त्यानंतर त्यात कच्चे दूध घाला. तयार झालेला फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि सुकेपर्यंत तसाच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा आणि मान धुवून घ्या. हा घरगुती फेसपॅक टॅन घालवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

लिंबाचा रस, मध आणि साखर

एका वाटीमध्ये एक चमचा लिंबाचा रस, थोडे मध आणि थोडी साखर टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. ज्यामुळे त्वचेचे तेज वाढते. मधामुळे त्वचा मॉइस्चराइज राहते, तर साखर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे कार्य करते. त्यामुळे या तीन गोष्टींचे मिश्रण टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर आहे.

Hair Care Tips : शॅम्पू लावल्यानंतर तुमचे केस आणखीनच गळतात का? ‘या’ टिप्समुळे होईल फायदा

दूध आणि लिंबाचा रस

एका वाटीमध्ये थोडे कच्चे दूध घ्या आणि त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांसाठी तसेच असू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे टॅन जाण्यास मदत होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Diabetes Tips: ‘या’ वनस्पतीची पाने चघळल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, जाणून घ्या ते कसे वापरावे
फोटो गॅलरी