Premium

Cleaning Tips : बाथरूमच्या स्वच्छतेसाठी करा ‘या’ गोष्टीचा वापर; आश्चर्यकारक फरक दिसेल

आता लवकरच दिवाळीची साफसफाई सुरू होईल. त्यात बाथरूमची स्वच्छता करायला सर्वांना कंटाळा येतो, पण जर तुम्ही बाथरूमची स्वच्छता करताना एक गोष्ट वापरली तर तुम्हाला खूप मोठी मदत होईल.

bathroom cleaning tips
Photo : Freepik

आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी सतत घराची साफसफाई केली जाते. थोड्या दिवसांवर आलेल्या दिवाळीत तर संपुर्ण घराची व्यवस्थित सफाई केली जाते. आपण कितीही प्रयत्न केले तरी फरशीवरील किंवा इतर ठीकणांवरील खूप दिवसांपासून असणारे डाग निघत नाहीत. विशेषतः बाथरूममधील डाग. कारण बाथरूममधील फारशीवर सतत पाणी वापरले जाते त्यामुळे तिथल्या फरशीला डाग पडू शकतात. अशावेळी जर तुम्हाला बाथरूमसहा सर्व लख्ख चकाकणारे हवे असेल तर तुम्ही एक टिप वापरू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाथरूम स्वच्छ करताना तुरटी वापरा
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरणे हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तुरटी बाजारात सहज उपलब्ध होईल आणि ती वापरण्यासही अतिशय सोपी आहे. बाथरूमच्‍या साफसफाईसाठी तुरटीचा वापर कसा करायचा जाणून घ्या.

Cooking Tips : कोणतीही भाजी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

वॉश बेसिन असे स्वच्छ करा
बाथरूमचे वॉश बेसिन आणि स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी तुम्ही तुरटी वापरू शकता. यासाठी तुरटीचा तुकडा पाण्यात टाका आणि सुमारे २० मिनिटे राहू शकता. तुरटी पाण्यात चांगली विरघळली की त्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा आणि याच्या मदतीने आठवड्यातून दोनदा वॉश बेसिन स्वच्छ करा.

नळ आणि शॉवरवरील गंज असा स्वच्छ करा
पाण्याच्या सतत संपर्कात असल्यामुळे बाथरूमचे नळ आणि शॉवर अनेकदा गंजतात, त्यामुळे त्यावर डाग दिसतात. हे डाग तुरटी वापरुन काढता येतील. यासाठी २ इंच तुरटी किंवा तुरटीची पावडर एक मग पाण्यात मिसळून चांगले मिसळा आणि त्यात दोन चमचे व्हिनेगर घाला. नळ आणि शॉवरवर हे तुरटीचे पाणी स्प्रे करा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर क्लिनिंग ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने ते साफ करा. यानंतर, नळ पाण्याने धुवून स्वच्छ करा.

Navratri Diet Tips : मधूमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

टाइल्स व आरसा असा स्वच्छ करा
बाथरूमच्या टाइल्स आणि आरशांवर अनेकदा पाण्याचे डाग पडतात, जे तुरटीने सहज साफ करता येतात. यासाठी १ लिटर पाण्यात तुरटीचे १ ते २ इंच आकाराचे तुकडे टाकून पाणी गरम करा. यानंतर या पाण्यात कापड ओले करून त्याने टाइल आणि आरशावरील डाग स्वच्छ करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use this one helpful thing while cleaning bathroom kitchen basin you will deffinately be amazed by the result pns

First published on: 27-09-2022 at 11:47 IST
Next Story
नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?