Premium

Kitchen Tips : यापुढे डोसे, घावण तव्याला अजिबात चिकटणार नाही; ‘हा’ पदार्थ घेईल त्याची काळजी, पाहा ही सोपी ट्रिक

एखादा तवा सतत वापरल्यानंतर कालांतराने तव्यावर पदार्थ चिकटून राहतात. अशावेळी तवा चांगला राहावा आणि पदार्थ लगेच सुटून यावे यासाठी ही सोपी आणि घरगुती टीप पाहा.

kitchen hack for sticky dosa tawa
डोसा सतत तव्याला चिकटत असेल तर ही ट्रिक वापरुन पाहा. [photo credit – Freepik]

काहीतरी वेगळं खायचं म्हणून आपण पटकन डोसा किंवा घावण यासारखे पदार्थ बनवायचा विचार करतो. नंतर अगदी आवडीने त्याची सर्व तयारी करतो आणि आपण स्वयंपाकघरात डोसे घालायला बनवायला उभे राहतो. पण बरेचदा पाहिलाच डोसा बनवला की तो तव्याला घट्ट चिकटून राहतो. मग त्यावर कितीही तेल सोडा, पाणी मारा तरीही तो निघायचं काही नाव घेत नाही. अशावेळेस चिडचिड होऊन आता डोसा नीट सुटून यावा यासाठी काय करावं हे अजिबात सुचत नाही आणि आपला सगळा ‘मूड ऑफ’ होतो. असं तुमच्यासोबतही झालं आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा नवीन तवा आणतो, तेव्हा सुरुवातीला त्याचा त्रास आपल्याला होत नाही. कारण तो नॉन स्टिक तवा असतो. पण, जसजसा त्याचा वापर वाढत जातो तसतसा त्यावर डोसा, घावण, थालीपीठ यांसारखे पदार्थ चिकटण्यास सुरुवात होते. यासाठी एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @ok_chilli_food या अकाउंटने पदार्थ तव्याला चिकटू नये, यासाठी एक भन्नाट आणि प्रचंड सोपी अशी हॅक सांगितली आहे. ही हॅक किंवा ट्रिक नेमकी काय आहे ते पाहा.

हेही वाचा : रस्समने दात आंबले? पाहा, साऊथ इंडियन रस्सम बनवताना या पाच टिप्स ठरतील उपयोगी

पदार्थ तव्याला चिकटू नये यासाठी ही सोपी ट्रिक पाहा

  • सर्वप्रथम तवा व्यवस्थित तापवून घ्या.
  • त्यावर चमचाभर मीठ पसरून एका पेपरने तव्यावर घासून घ्या.
  • आता ते मीठ बाजूला काढून घेऊन तव्यावर थोडे तेल लावून घ्या.
  • आता पुन्हा एकदा चमचाभर मीठ तव्यावर घालून पेपरने घासून घ्या.
  • तव्यावरील सर्व मीठ काढून टाकून तवा कापडाने पुसून घ्या.
  • पुन्हा त्यावर थोडे तेल लावून तापलेल्या तव्यावर पाणी शिंपडून घ्या. यामुळे तव्याचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते.
  • आता तुमचे डोश्याचे पीठ घालून डोसे बनवून घ्या. डोसा न चिकटता अगदी व्यवस्थित सुटून येईल.
  • आहे न अतिशय सोपी ट्रिक. आता पुढच्यावेळेस जेव्हा तुम्ही डोसा किंवा घावण बनवणार असाल तेव्हा ही हॅक नक्की वापरून पाहा.

इन्स्टाग्रामवरील @ok_chilli_food या अकाउंटने शेअर केलेल्या या अतिशय उपयुक्त अशा किचन ट्रिकला ४५.३ K इतके व्हियूजदेखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use this super easy kitchen trick for your dosa tawa check out this amazing video dha

First published on: 04-12-2023 at 18:13 IST
Next Story
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या