डॉ. माधुरी रॉय

गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (ठळअ‍ॅक) या शासकीय संस्थेने शिफारस केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठळअ‍ॅकच्या या शिफारशी मान्य केल्या आहेत. या निर्णयाद्वारे गर्भवती महिलांना ‘कोविड १९’ लसीकरणाबाबत माहिती दिली जात असून राष्ट्रीय कोविड प्रतिबंध लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा निर्णय कळवण्यात आला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

लसीकरणापूर्वी गर्भवती महिलांनी घ्यावयाची दक्षता

’ तुम्ही वैद्यकीयदृष्टय़ा परिपूर्ण आहात की नाही याबाबत तुमच्या प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

’ आपल्या मुलाची वाढ आपल्या गरोदरपणाच्या प्रत्येक आठवडय़ात योग्य रीतीने होते की नाही ते तपासा.

५आपल्याला अशक्तपणा किंवा कोणत्याही प्रकारचा मूत्रसंसर्ग होत नाही, याची खात्री करून घेण्यासाठी आपले रक्त आणि मूत्रघटक तपासून घ्या.(तसे असल्यास प्रथम संसर्गाचा उपचार करा आणि समस्या दूर करा.)

’ आपला रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य श्रेणीत आहे की नाही ते तपासून पाहा. तसेच आपले वजन तपासा.

५तुमची गर्भधारणा सामान्य आहे का याची खात्री करा. तुम्हाला लसीकरणापासून काही गुंतागुंत होण्याचा धोका नाही ना हे तपासून घ्या.

’ कोमोर्बिड असल्यास, वाढलेले वय, उच्च बीएमआय असलेल्या महिलांनी लसीसाठी जाण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कोणत्या स्थितीत लसीकरण करू नये?

’ गर्भवती महिलांनी खालील परिस्थितींमध्ये लसीकरण टाळावे : कोविड-१९ लसीच्या आधीच्या मात्रेवर आधीच्या अ‍ॅनाफिलेक्टिक किंवा अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया दिसल्यास.

’ लस किंवा इंजेक्टेबल थेरपीज, फार्मास्युटिकल उत्पादने, खाद्यपदार्थ यांची अ‍ॅलर्जी दिसल्यास.

अटी कोणत्या?

’ अलीकडच्या काळात करोनाचा संसर्ग झाला होता- संसर्गापासून १२ आठवडे किंवा दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली असल्यास ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा करा.

करोनाची बाधा झाल्यास

’ करोनाची बाधा झाल्यानंतर अँटिकोविड मोनोक्लोनल अँटिबॉडीज किंवा कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचा उपचार घेतलेले आहेत.

लसीकरणानंतरची काळजी

’ कोणत्याही औषधाप्रमाणे लशीचे दुष्परिणामदेखील होऊ  शकतात जे सामान्यपणे सौम्य असतात.

’ सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होऊ  शकते किंवा १-३ दिवस बरे न वाटणे.

’ गर्भ आणि मुलासाठी लसीचे दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम आणि सुरक्षितता अद्याप अभ्यास झालेले नाहीत.

’ फार क्वचितच, (एक लाख व्यक्तींपैकी एक) लस घेतल्यानंतर खालील काही लक्षणांचा अनुभव २० दिवसांच्या आत येऊ  शकतो ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते.

’ दम लागणे (श्वास घेण्यास त्रास)

’ छातीत दुखणे

’ वेदना किंवा सूज

’ रक्तस्राव किंवा लसीकरण केलेल्या भाग सोलवटणे.

’ उलटय़ा किंवा सतत पोटदुखी

’ उलटय़ा झाल्याशिवाय किंवा न करता तीव्र आणि सतत डोकेदुखी (मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखीचा इतिहास नसणे)

’ अशक्तपणा/ पक्षाघात किंवा शरीराच्या कोणत्याही विशिष्ट बाजूला कोणत्याही कारणाशिवाय सतत अशक्तपणा येणे.

’ अस्पष्ट दृष्टी किंवा डोळ्यांमध्ये वेदना

या सर्व लक्षणांवर लक्ष केंद्रित करा आणि त्वरित आपल्या डॉक्टरांना माहिती द्या.

काय काळजी घ्याल?

’ शरीरातील पाण्याची पातळी, पोषण तपासणे.

’ गर्भाच्या हालचालींवर लक्ष ठेवा.

’ नियमित चाचणी करा. औषध घेणे टाळू नका.

’ भरपूर विश्रांती घ्या.

लसीकरण झाल्यानंतर हे करू नका

’ कोणतेही घरगुती उपचार किंवा काढा स्वत:च्या मर्जीने घेऊ नका.

’ आपल्या डॉक्टरांनी शिफारस केलेली कोणतीही हर्बल उत्पादने वापरू नका (आयुर्वेद किंवा होमीओपॅथी किंवा इतर कोणतेही) भिन्न औषधे मिसळू नका.

’ कोणत्याही अफवा आणि गैरसमजुतींना बळी पडू नका.

’ आपल्या सुरक्षेची खबरदारी घ्या. लसीकरणात कोणत्याही संरक्षणात्मक अँटिबॉडीज विकसित होण्यासाठी दोन महिने लागू शकतात.

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Story img Loader