Private Part Health: २१ व्या शतकात प्रायव्हेट पार्टची काळजी कशी घ्यावी हा विषय गरजेचा आहे. त्यामुळेच मैत्रिणींनो कुठलाही संकोच न बाळगता तुम्हालाही तुमच्या मनातील प्रश्न सोडवून घेता यावेत यासाठी हा प्रयत्न… अनेकदा महिलांना प्रायव्हेट पार्टला व त्याच्या आजूबाजूला खाज सुटते किंवा जळजळ जाणवते. काहीवेळ यामुळे असहाय्य वेदना होऊ शकता. असं नेमकं कशाने होतं व त्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यास उपाय होऊ शकतो का हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

प्रायव्हेट पार्टला खाज व जळजळ का होते? (Why Vagina Gets Itchy and Loose)

हेल्थशॉट्सने डॉ. चेतना जैन, संचालक प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग, क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांशवेळा खाज व जळजळ होण्यामागे यीस्टचा संसर्ग कारण असू शकतो. जर एखाद्या महिलेला एका वर्षात चार भागांपेक्षा जास्त संसर्ग झाला असेल तपासणीची आवश्यकता आहे. इन्स्टिट्यूट फॉर क्वालिटी अँड एफिशियन्सी इन हेल्थ केअरच्या मते, योनीतून यीस्टचा संसर्ग सामान्य आहे, कारण १०० पैकी ७५ महिलांना आयुष्यात एकदा तरी हा संसर्ग होतो.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

प्रायव्हेट पार्टच्या संसर्गावर उपचार: मीठाचे पाणी?

डॉ जैन म्हणतात की मीठ घातलेले गरम पाणी प्रायव्हेट पार्टला खाज सुटणे आणि अस्वस्थता तात्पुरती कमी करते, परंतु दीर्घकालीन परिणाम होत नाही. पारंपारिकपणे, खड्याच्या मीठात मॅग्नेशियम सल्फेट अधिक असते. तज्ज्ञ स्पष्ट करतात की मीठ असलेले कोमट पाणी साधारणपणे योनिमार्गाला रक्तपुरवठा वाढवते. हे नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा भाग म्हणून योनिमार्गातील संसर्ग कमी करू शकते. पण थेट मीठ वापरल्याने योनीमार्गाचा संसर्ग वाढू शकतो.

प्रायव्हेट पार्ट स्वच्छतेसाठी मीठ व गरम पाणी: होय की नाही?

लक्षात घ्या, जननेंद्रियाचा भाग खूप संवेदनशील असतो. तज्ञ म्हणतात की ३७ अंशांपेक्षा जास्त तापमानामुळे फोड्या येणे आणि जळजळ होऊ शकते. त्यात मीठ घातल्यास ते आणखी वाईट होईल. तुमच्या प्रायव्हेट पार्टवर मीठ टाकून गरम पाणी न वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे, योनीमार्गाच्या संसर्गाच्या उपचारासाठी गरम मिठाच्या पाण्याने आंघोळ न करणे चांगले नाही.

प्रायव्हेट पार्ट सैल झाल्यास मिठाचे पाणी ठरेल उपाय? (Salt Water For Vagina Tightening)

मीठ थेट वापरल्याने योनीमध्ये जळजळ होऊ शकते. योनीतून हेल्दी जीवाणू सुद्धा काढून टाकले जाऊ शकतात, व परिणामी योनिमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून, योनीमार्ग सैल झाल्यास मिठाऐवजी खालील पर्याय वापरून पाहता येतील..

१) घट्ट कपडे घालणे टाळा
२) प्रायव्हेट पार्टवर साबण आणि सुगंधित वस्तू वापरणे टाळा
३) शुद्ध खोबरेल तेलाचा वापर
४) दह्यासारख्या प्रोबायोटिक्सचे सेवन

हे ही वाचा<< किडनीतील घाण लघवीवाटे बाहेर फेकू शकते ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक; अवघ्या २० रुपयात घरीच बनवून पाहा

जरी हे घरगुती उपाय लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात, परंतु योग्य तपासणी आणि योग्य उपचारांसाठी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घेणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांमुळे ताबडतोब थोडा आराम मिळू शकतो, परंतु दीर्घकाळासाठी हे करणे सर्वोत्तम गोष्ट असू शकत नाही.