तुम्ही जर एखाद्याचे व्हॅलेंटाईन असाल तर खात्री आहे की तुम्ही उद्या व्हॅलेंटाईन डे निमित्त डेटवर घालण्यासाठी आउटफिटपासून ते स्टायलिश शूज आणि हेअरस्टाइलपर्यंत सर्व काही आधीच प्लॅन केले असेल, परंतु मेकअपमध्ये तेच स्मोकी डोळे आणि गुलाबी लिपस्टिक लावल्याने काम होणार नाही. जर कपडे आणि शूज स्टायलिश असतील तर मेकअप देखील ट्रेंडनुसार असावा. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रकारचा मेकअप तुम्हाला वेगळा आणि खास दाखवू शकतो.

फाउंडेशन फॅक्ट

फाउंडेशन हा मेकअप मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाताना मेकअप करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा फाउंडेशन टोन डार्क असला पाहिजे. त्यात लिक्विड फाउंडेशन लावा. यामुळे त्वचेचा टोन एकसारखा होईल. जर त्वचा कोरडी असेल तर मॉइश्चरायझर रिच फाउंडेशन लावा. उन्हाळ्यात ऑईल फ्री फाउंडेशन लावणे सुरक्षित आहे.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

परफेक्ट प्राइमर

मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी चेहऱ्यावर प्राइमर लावा. डोळ्याभोवती आणि असमान त्वचेच्या टोनवर प्राइमर किंवा कन्सीलर स्टिक लावा आणि त्यानंतर त्यावर फेस पावडर लावा. प्राइमरच्या दोन शेड्स आहेत, त्यामुळे तुमच्या स्किन टोननुसार ते निवडा.

आय शॅडो

आता तुम्ही डोळ्यांना आय शॅडो लावताना आर्डी शेड्स आय सिलिकॉन फ्री, मिनरल ऑइल फ्री, आर्टिफिशियल कलर फ्री, डर्मेटोलॉजिकल टेस्टेड, सल्फेट फ्री आय शॅडो असे काही प्रकार सध्या ट्रेंडिंग आहेत. यावेळी तुम्हाला डार्क लिप लिपस्टिकसह आर्डी शेड आय शॅडो डेटवर जाताना परफेक्ट लुक देईल. तसे, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही गोल्डन आणि सिल्वर आयशॅडो देखील वापरून पाहू शकता.

ट्रान्सपरंट मस्कारा

तुमच्या लिपस्टिकची शेड ही डार्क असेल तर डोळ्यांवर ट्रान्सपरंट मस्कारा लावा. याने तुम्ही लावलेली लिपस्टिक पूर्णपणे हायलाइट होईल. तसेच तुम्ही ब्लॅक मस्करा देखील निवडू शकता. याबरोबर तुमच्या डोळ्यांचा मेकअप हा लाइट असावा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डोळ्यांखाली क्रिस्टल आणि मेटॅलिक ग्लिटर देखील लावून शकता.

लिप कलर ट्रेंड

लिप कलर ट्रेंड हे तुम्हाला थोडसं वेगळं वाटलं असेल ना, तर जास्त वेळ टिकून राहणारी आणि डार्क रंग असलेल्या लिपस्टिक सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे गुलाबी, मरून किंवा केशरी रंगाचा कोणताही शेड तुम्ही निवडाल तेव्हा याच्यातील डार्क शेड निवडा. त्यात तुमची लिपस्टिक ही जास्त वेळ टिकण्यासाठी ओठांवर लावल्यानंतर त्यावर पावडर लावा व हलक्या हाताने ती पावडर पुसा आणि नंतर पुन्हा ओठांवर लिपस्टिक शेड लावा.

जेली लिप ग्लॉस

यावेळी मेकअप ट्रेंडची खास गोष्ट म्हणजे लिप ग्लोस पूर्वीप्रमाणेच आहे. जेली लिप ग्लॉस लावल्याने तुमचे ओठ हायड्रेट राहतील. त्यात एप्रिकॉट तेल असल्यामुळे ओठांचा रंगही चांगला राहतो. त्याच बरोबर तुम्ही जेली लिप ग्लॉस विकत घ्याल तेव्हा क्लियर ग्लॉस खरेदी करा. तुम्ही ते लिपस्टिकच्यावर लावू शकता.