अॅमेझॉनची मोटोरोलाच्या मोबाईलवर मिळेतील ‘या’ खास ऑफर

‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्ताने फेस्टचे आयोजन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने देशातील विविध दुकाने, मॉल सजले आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटसनेही आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी काही आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला तुम्ही काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर या पर्यायांचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. अॅमेझॉनने नुकताच मोटो फेस्ट जाहीर केला असून ग्राहकांना मोटोरोला कंपनीची उत्पादने कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

१३ फेब्रुवारी पासून सुरु होणारा हा मोटो फेस्ट १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये Moto G5s Plus, Moto G5 Plus आणि Moto G5 वर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. Moto G5s Plus हा फोन १३,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. १ हजारांची सवलत आणि २ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर यामध्ये देण्यात आली आहे. ५.५ इंचांचा एचडी डिस्प्ले असलेल्या या फोनला गोरिला ग्लास देण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर असून ४ जीबीची रॅम देण्यात आली आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या फोनची १२८ जीबीची एक्स्पांडेबल मेमरी देण्यात आली आहे. १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असणाऱ्या या फोनला ड्युएल एलईडी फ्लॅशही देण्यात आले आहेत.

याबरोबरच G5 Plus १०,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. Moto G5s हा G5s Plus चा लहान व्हेरिएंट असून तो ११,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. तर Moto G5 ८,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. नुकताच व्हॅलेटाईन डेच्या निमित्ताने आयफोनकडूनही ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान iPhone SE, iPhone 6 आणि iPad वर आकर्षक कॅशबॅक ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना iPhone SE अवघ्या १५ हजारांत खरेदी करता येणार आहे. तर iPhone 6 वर ७ हजारांची सूट मिळून तो २० हजारांना खरेदी करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Valentine day amazon moto fest offers on moto g5s plus moto g5s moto g5 plus

ताज्या बातम्या