scorecardresearch

Kiss Day 2024 : चुंबनाचे प्रकार किती? कोणत्या Kiss चा काय अर्थ असतो, जाणून घ्या…

Valentine’s Week, Kiss Day 2024 : किस करण्याचे विविध प्रकार असून, प्रत्येक किस करण्याच्या पद्धतीमागे ठरावीक अर्थ असतो, असे म्हटले जाते. ‘किस डे’निमित्त त्याबद्दल थोडी माहिती पाहू.

Kiss Day 2024 Different Types of Kisses and Their Meaning in Marathi
किस डे २०२४ किसचे विविध प्रकार आणि त्यांचे अर्थ [Photo credit -Freepik]

Types of Kisses and Meaning : आपले एखाद्यावर प्रेम आहे हे दाखवून देण्याच्या विविध पद्धती असतात. तसेच प्रत्येक नात्यामध्ये त्यांचे भाव आणि अर्थदेखील बदलतात. म्हणजे आता आई आपल्या बाळाला जवळ घेते आणि त्याच्या डोक्याचा पापा घेते. हे ती तिची माया दाखविण्यासाठी करते. तसेच प्रियकर आणि प्रेयसी किंवा नवरा-बायको आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी गालांवर, ओठावर किंवा मानेवर किस करतात.

किस करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तसेच त्यांचे वेगवेगळे अर्थदेखील असतात, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ या तारखांदरम्यान ‘व्हॅलेंटाइन्स डे वीक’ आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातो. या सात दिवसांत प्रत्येक दिवशी ठरावीक अशी गोष्ट तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुमचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तींसाठी केली जाते. त्यातच १३ तारखेला ‘Kiss day’ असतो. मात्र, एखाद्या व्यक्तीला किस करण्याआधी किस करण्याच्या या ‘सात’ प्रकारांचे अर्थ समजून घ्या.

Narayan Range Manoj Jarange
“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Polyamory Relationship
पॉलिअ‍ॅमरी नातेसंबंध म्हणजे काय? पॉलिॲमरीची प्रकरणे दिवसेंदिवस का वाढत आहेत?
devendra fadnavis chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

हेही वाचा : Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा

१. गालावर किस करणे

अशी एखादी व्यक्ती जी तुम्हाला खूप जवळची आहे; जिच्याबद्दल तुम्हाला स्नेह वाटतो, अशा व्यक्तींना गालावर किस केले जाते.

२. कपाळावर किस करणे

कौतुक, काळजी किंवा सुरक्षिततेची भावना दर्शविण्यासाठी कपाळावर किस केले जाते. तुम्ही अशा पद्धतीने कोणाला किस करीत असाल किंवा तुम्हाला जर कुणी कपाळावर किस करीत असेल, तर या कृतीमधून समोरच्या व्यक्तीला तुमच्यासह सुरक्षित असल्यासारखे वाटते, असे दाखवून देण्याचा प्रयत्न असतो.

३. हातावर किस करणे

एखाद्या व्यक्तीचा तुमच्यामध्ये रस आहे हे दाखविण्यासाठी ती तुमच्या हातावर किस करते. तसेच अनेक संस्कृतींमध्ये ही कृती आदर आणि कौतुक दाखविण्यासाठीही केली जाते.

४. फ्रेंच किस करणे

जोडप्यांचे, प्रेमिकांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे हे दर्शविण्यासाठी ओठांवर उत्कटपणे केल्या जाणाऱ्या किसचा हा एक प्रकार आहे. ‘फ्रेंच किस’ करून प्रेमी एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेम आणि आकर्षणाच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवतात.

हेही वाचा : तुम्ही ‘Unhealthy relationship’ मध्ये आहेत का? हे ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स लक्षात ठेवा…

५. कानाला किस करणे

प्रेमी कानाला किंवा कानाच्या भागांना किस करून आपल्या जोडीदाराला चेतवण्याचा प्रयत्न करीत असतो. हा किसिंगचा एक सेन्श्युअस म्हणजेच कामुक प्रकार आहे.

६. मानेवर किस करणे

लैंगिक हेतूंबद्दल मूकपणे किंवा मानेवर किस करून, जोडीदार आपल्या इच्छांचे प्रदर्शन करीत असतो. अशा प्रकारचा किस हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदारावर प्रचंड प्रेम असताना करते.

७. नाकावर किस करणे

जोडीदार मजा-मस्करीत किंवा आपला खट्याळपणा नाकावर किस करून दर्शवतो. किस करण्याचा हा सर्वांत गोड आणि मजेशीर प्रकार आहे, असे समजले जाते. अशी सर्व माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून मिळाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Valentine week kiss day 2024 do you know these seven different types of kisses and their meanings check out dha

First published on: 12-02-2024 at 20:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×