valentine week list 2026 In Marathi : सोशल मीडियावर आजवर प्रेमाची अनेक रूपं आपण पाहिली असतील. काही अगदीच गोड तर काही अगदीच विचित्र, कसंही असलं तरी प्रत्येकासाठी आपलं प्रेम खास असतं. अशातच प्रेम व्यक्त करणाऱ्यांसाठी दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकही साजरा केला जातो. फेब्रुवारी महिना सुरू होताच व्हॅलेंटाईन वीकचे वेध सगळ्यांना लागते. प्रेम करणाऱ्यांसाठी हा महिना खूप खास असतो. कारण आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही.

दरवर्षी ७ ते १४ फेब्रुवारी असा संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस खास असतो. तर लवकरच व्हॅलेंटाईन वीक सुरू होणार आहे. मग यंदा व्हॅलेंटाईन वीकमध्ये (Valentine Week 2026) कोणत्या दिवशी कोणता दिवस आहे चला जाणून घेऊ…

रोज डे, ७ फेब्रवारी २०२६ (शनिवार)

रोज डेला हव्या त्या व्यक्तीला गुलाबाचं फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करू शकता.

प्रपोज डे, ८ फेब्रुवारी २०२६ (रविवार)

रोज डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावना नीट व्यक्त करू शकत नसाल, तर प्रपोज डे ही तुमचं मन व्यक्त करण्याची आणखी एक संधी आहे.

चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार)

प्रपोज करूनही भावना व्यक्त करण्यात अडचण येत असेल तर चॉकलेट देऊन मनातलं बोलण्याचा प्रयत्न करून बघा…

टेडी डे, १० फेब्रुवारी २०२६ (मंगळवार)

एक खास भेटवस्तू म्हणून टेडी द्या आणि मनातील भावना व्यक्त करा.

प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी २०२६, (बुधवार)

या दिवशी तुम्ही एकमेकांना तुमचं नवं नातं सुरू करण्याचं वचन देऊ शकता.

हग डे, १२ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार)

किस डे, १३ फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार)

व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी २०२४ (शनिवार)

तसं बघायला गेलं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची वाट बघण्याची गरज नसते. पण, तुम्ही या व्हॅलेंटाईन वीकपैकी एका खास दिवसाची निवड करून स्वतःचे प्रेम व्यक्त करू शकता ; जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला हा दिवस आणखीन चांगला लक्षात राहील.