Valentine Week All Days Wishes Messages Status in Marathi: फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना आहे असं म्हटलं जातं. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असला तरी त्याच्या आठ दिवस आधीपासूनच रोझ डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे डेज सुरू होतात. व्हॅलेंटाईन डे ची वाट प्रत्येक कपल पाहत असते. २०२६मध्ये देखील ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस आपल्या पद्धतीने खास असतो. काही जण रोझ डेच्या दिवशी त्यांच्या भावना व्यक्त करतात. तर काही जण प्रपोज डे किंवा चॉकलेट डे त्यांच्या नात्यासाठी अगदी स्पेशल बनवतात.

७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या व्हॅलेंटाईन वीकमध्ये नेमके कोणते दिवस कधी आहेत हे जाणून घेऊ. याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसासाठी खास कविता आणि प्रेम संदेश देखील जोडीदारासोबत तुम्ही शेअर करू शकता.

७ फेब्रुवारी – रोझ डे

व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे पासून होते. तेव्हा गुलाबाचा सुंद पुष्पगुच्छ देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, तर इतर रंगदेखील वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. हा दिवस तुमच्या जोडीदाराला किंवा खास व्यक्तीला स्पेशल वाटण्यासाठी तुम्ही छान मेसेजही पाठवू शकता.

तू गुलाब आहेस, तू प्रेमाचा सुगंध आहेस
तू माझ्या हृदयात आहेस आणि तू माझं जग आहेस
रोझ डे निमित्त एकच इच्छा आहे
तू कायम आनंदी राहो, कारण तू माझी आहेस…
Happy Rose Day Love…

गुलाबासारखा सुंदर क्षण,
तू माझ्यासाठी खूप खास आहेस,
म्हणून रोझ डेनिमित्त, हे हृदय तुला सांगत आहे
तू माझ्या आयुष्यातील पहिलं खरं प्रेम आहेस…
Happy Rose Day Love…

या गुलाबाशपथ मी सांगते,
तू माझ्या आयुष्याचा सार आहेस.
तू प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात राहतोस,
तू प्रेमाचा अर्थ आहेस…
Happy Rose Day Love…

खास पतीसाठी-
गुलाब तुझ्याइतकाच सुंदर आहे,
तुझे स्मित एका फुलणाऱ्या ताऱ्यासारखे आहे.
रोझ डेनिमित्त तुला हा माझा प्रेमळ संदेश आहे,
तू माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान भेट आहेस…
Happy Rose Day…

तू माझ्या हृदयात आहेस,
तू माझ्या डोळ्यात आहेस,
तू माझ्या स्वप्नात आहेस, तू प्रत्येक क्षणात आहेस.
या रोझ डेला मी तुला वचन देतो…
मी नेहमी तुझ्यासोबत आहे…

८ फेब्रुवारी – प्रपोज डे

रोझ डेनंतर दिवस आहे तो प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रेम कबूल करण्याचा. जर तुम्ही अजूनही तुमच्या भावना व्यक्त केल्या नसतील तर यापेक्षा चांगला दिवस नाही. एखादी छान भेटवस्तू देऊन तुम्ही त्याला किंवा तिला प्रपोज करू शकता.

९ फेब्रुवारी – चॉकलेट डे

प्रपोज केल्यानंतर काहीतरी गोड तर झालंच पाहिजे. तेव्हा मग येतो चॉकलेट डे. तुमच्या खास व्यक्तीच्या आवडीचं एखादं चॉकलेट देऊन तुमचं नातं आणखी गोड करण्याचे वचन त्यांना द्या.

१० फेब्रुवारी – टेडी डे

या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमची अनुपस्थिति भरून काढण्यासाठी म्हणून एखादा छान टेडी देऊ शकता. ते पाहून त्यांना कायम या सुंदर क्षणाची आठवण येईल आणि मन आनंदी राहील.

११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे

प्रेमात दिलेलं वचन बोलण्याइतकं सोपं नाही, तर खरंच खूप अवघड असतं. अनेकांना नातं निभावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्याचे, प्रत्येक आनंदात आणि दु:खात त्यांची साथ देण्याचे आणि कायम आनंदी राहण्याचे वचन देऊ शकता.

मला तुझा हात हवा आहे,
मला तुझा सहवास हवा आहे,
हेच वचन एकमेकांकडून हवं आहे…
I Promise…

मी तुझी सावली होईन,
जिथे जाशील तिथे मी येईन,
सावल्या तुम्हाला अंधारात सोडून जातात,
पण अंधारात तुझा प्रकाश होईन…

१२ फेब्रुवारी – हग डे (Hug Day)

मिठी ही फक्त एक कृती नाही, तर त्यामागे एक खोलवर भावना आहे. मिठी ही खऱ्या प्रेमाचे आणि भावनांचे प्रतीक आहे. या दिवशी तुमच्या जोडीदाराला प्रेमाने मिठी मारा आणि त्यांना सांगा की काहीही झाले तरी तुम्ही त्यांच्यासाठी कायम सोबत असाल.

काही जण याला जादुई मिठी म्हणतात,
काही जण प्रेम म्हणतात,
पण मला वाटते यात तुझी ऊब आहे…

१३ फेब्रुवारी – किस डे

किस ही एक प्रेम व्यक्त करण्याची आणि ते मनापासून जाणवून देण्याची कृती आहे. या दिवशी किस करणे हे तुमचे नाते अधिक मजबूत आणि घट्ट करते.

तुझ्या ओठांचा स्पर्श माझ्या गालावर होऊ दे,
केवळ शरीरानेच नाही तर आत्म्याने सुद्धा एकत्र येऊ दे…

१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणझे व्हॅलेंटाईन डे. हा सर्वात खास दिवस आहे. जेव्हा नातं अधिक घट्ट करायचं असेल तेव्हा या दिवसाचा पूरेपूर उपयोग करा. जोडीदाराला एखादी छान भेटवस्तू देऊन प्रेम आणि समर्पण व्यक्त करू शकता.

तुझ्या आगमनाने माझे आयुष्य सुंदर आहे,
तुझा चेहरा माझ्या मनात आहे,
चुकूनही माझ्यापासून दूर जाऊ नको,
कारण मला प्रत्येक क्षणी तुझी गरज आहे…

Happy Valentines’s Day