scorecardresearch

Valentine’s Day 2022: व्हॅलेंटाईन डे चे हे Messages, WhatsApp Status पाठवून तुमच्या जोडीदाराला करा इम्प्रेस!

१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो तर कुणी आपलं प्रेम व्यक्त करतो…या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी हे मेसेज एकदा नक्की पाठवा.

Valentines-Day-2022

१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…आपल्या जोडीदारासाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. सध्याच्या करोना परिस्थिती पाहता अनेक कपल्सना या दिवशी एकमेकांना भेटून यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करता येणार नाही. पण या दिवशी तुम्ही Valentine’s Day Messages, WhatsApp Status पाठवून तुम्ही तुमच्या जोडीदारापर्यंत तुमच्या भावना पोहोचवून हा दिवस साजरा करू शकता.

Valentine’s Day 2022 Messages In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी मेसेज

रात्री चंद्र असा सजला होता,
ताऱ्यांनी चिंब भिजला होता,
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिचाऱ्याचा चेहरा पडला होता!

प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे….

प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्या सहवासात कळाले
तू माझ्या आयुष्यात आल्याने स्वर्गसुख मिळाले
कधी सोडू नकोस साथ माझी
जन्मभर राहिन मी फक्त तुझी!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……. ♥

तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
Happy Valentine’s Day

शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

आणखी वाचा : ‘या’ कारणासाठी हनिमूनला जोडप्यांची रूम गुलाबाच्या फुलांनी सजवली जाते

रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस,
पहाटे अंगणातला पारिजात वेचताना….

माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली,
सोनियाची तू माळ…

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तू जवळ नसतानाही,
मला तुझं असणं हवं आहे…

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे…

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…

प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे..
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे!

आणखी वाचा : Beauty Care Tips : कच्च्या दुधाने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात का? जाणून घ्या

नेहमी तुला विसरायचं ठरवून
नेहमी तुला आठवत राहते
स्वतःला कधी विसरता येतं का?
उमगून मग स्वतःवर हसत राहते!

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day!

तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस,
जिला कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूही नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत…..

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं
मग, तुझ्या नजरेतूनंच जायला हवं
पण असं काहीतरी घडण्यासाठी
तू एकदा तरी माझ्याकडे
प्रेमाने पाहायला हवं…
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत
स्थिरावतीलही कदाचीत…
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासात,
तुही माझ्या सोबत असायला हवं!

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे…
म्हणूनच माझ्या मनाची,
तुझ्याकडे ओढ आहे….
तुझ्या अबोलपणाचं कारण,
माझ्यावरील राग आहे….
मग मीही अबोलाच राहतो,
तसं राहणं मला भाग आहे!

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

Valentine Day Marathi Status | व्हॅलेंटाईन डे स्टेटस

तू नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात…

प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही….

प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता
जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता
प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला
जेव्हा तू मला मिळाला
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे!

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. ?
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! ?
Happy Valentine’s Day!

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! ?
Happy Valentine’s Day!

तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने
मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार
आज व्हॅलेंटाईन डे दिवशी
करते मी तुझ्या प्रेमाचा स्विकार
Happy Valentine’s Day

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन ?
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
Happy Valentine Day

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस…

खुप लोकांना वाटते I LOVE YOU हे
जगातील सुंदर शब्द आहेत… पण
खरं तर… “I LOVE YOU TOO”
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन
सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…
Happy Valentine Day

कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसणारं
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं
कुणीतरी असावं
आपलं म्हणता येणारं
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.
Be My Valentine….

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2022 at 20:37 IST

संबंधित बातम्या