Happy Valentine’s Day Wishes Quotes Messages Status : १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि नात्यांच्या उबदार भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गुलाब, चॉकलेट किंवा भेटवस्तू नव्हे, तर मनापासून व्यक्त केलेलं प्रेम, समजूत आणि आपुलकी. २०२६ मध्येही हा दिवस तरुणांसह विवाहित जोडपी, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसाठी खास ठरणार आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम बदलले असले, तरी भावनांची ओढ मात्र तशीच आहे. WhatsApp मेसेज, Instagram स्टेटस, Facebook पोस्ट किंवा साधा SMS — शब्दांमधून प्रेम व्यक्त करण्याची ताकद आजही तितकीच प्रभावी आहे. विशेषतः मराठीतून व्यक्त केलेले प्रेम अधिक आपुलकीचे आणि मनाला भिडणारे ठरते.
व्हॅलेंटाईन डे २०२६ निमित्त आम्ही तुमच्यासाठी खास नवीन आणि हटके मराठी चारोळ्या, शुभेच्छा संदेश सादर करत आहोत. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून हा दिवस अधिक खास करू शकता.
व्हॅलेंटाईन डे २०२५ मराठी शुभेच्छा (Valentine’s Day 2025 Wishes in Marathi)
तुझ्या हास्यात माझा दिवस उजळतो,
तुझ्या शब्दांत माझा श्वास जपतो,
जीवनाच्या वाटेवर हवी फक्त तुझी साथ
तुझ्याबरोबर प्रत्येक संकटावर करेन मी मात
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
हातात हात आणि मनात विश्वास असू दे,
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे गं सखे,
कसं सांगू तुला की किती प्रेम करतो मी तुझ्यावर
करशील आयुष्यभर प्रेम तू माझ्यावर
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
न बोलताही तू मला ओळखतेस,
माझ्या शांततेतही साथ देतेस,
प्रेम म्हणजे शब्द नाहीत फक्त,
ते तुझ्या अस्तित्वातून मला कळतेस.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाच्या वाटेवर चालताना,
तुझी सावली साथ देते मनाला,
शेवटच्या क्षणापर्यंत एकच वचन,
तुझ्याशिवाय नाही अर्थ जगायला.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम म्हणजे साथ अखंड असावी,
विश्वासाची दोरी घट्ट धरावी,
आयुष्यभर एकच इच्छा मनात,
तुझ्याबरोबरच ही वाट चालावी.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा

ज्या क्षणी तू माझ्या आयुष्यात आलीस,त्या क्षणापासून प्रेमाला एक नवी ओळख मिळाली.
तुझ्या अस्तित्वामुळेच माझ्या जगण्याला अर्थ मिळाला, माझ्या आयुष्याचा भाग बनल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
या प्रेमाच्या खास दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
तू केवळ माझं प्रेम नाहीस, तर माझ्या प्रत्येक स्वप्नामागची प्रेरणा आहेस.
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण अधिक सुंदर वाटतो, या व्हॅलेंटाईन डे ला माझं सगळं प्रेम फक्त तुझ्यासाठी
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
हातात हात दिलास तर वाट सोपी होते,
तुझ्यासोबत चालताना भीती गायब होते
आकाशाला गवसणी घालायची मिळते हिंमत
शब्दात कधीच मांडता येणार नाही माझ्या प्रेमाची किंमत
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
आज मनात दडलेल्या भावना मोकळ्या करू दे,
तुझ्या आठवणीत मला क्षणभर विसावू दे.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझीच साथ हवी,
कारण तुझ्याशिवाय कोणतीही वाट पूर्ण वाटत नाही.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा

कधी नजरेतून, तर कधी शांततेतून,
तू माझ्याशी सतत संवाद साधत असतेस.
संपत्ती किंवा वैभवाची नको आपल्याला
देशील ना आयुष्यभर साथ मला
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
तुझं प्रेम फुलाच्या सुगंधासारखं मनात दरवळतं,
तुझं हास्य माझ्या प्रत्येक दिवसाला उजळवतं.
तुला आनंदी पाहणं हेच स्वप्न आहे माझं,
कारण तुझ्या आनंदातच आहे सुख माझं.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रेमाची ऊब अजूनही तितकीच जिवंत आहे, आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती तशीच राहील.
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सुर आहेस, ज्यावर माझं संपूर्ण जीवन गीत रचलेलं आहे.
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाची व्याख्या विचारली, तर उत्तर एकच आहे — तू.
माझ्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक स्वप्नात आहेस फक्त तू
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्याशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण,
जसं शब्दांशिवाय कविता अपूर्ण.
माझ्या जगण्याचा खरा अर्थ आहेस तू
व्हॅलेंटाईन डे’च्या हार्दिक शुभेच्छा
या व्हॅलेंटाईन डे ला महागड्या भेटवस्तूंपेक्षा मनापासून लिहिलेला एक साधा संदेशही नात्याला नवी उर्जा देऊ शकतो. कारण प्रेम हे दाखवण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे.

