Vastu Tips: घरात स्वयंपाकघर ‘या’ दिशेला असावे, देवी लक्ष्मीची नेहमी कृपा राहील

स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. असं मानलं जातं की, जर घरातलं स्वयंपाकघर हेल्दी नसेल तर घरात सुख मिळत नाही. चला जाणून घेऊया स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे?

vastu-tips-for-kitchen

स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. असं मानलं जातं की, जर घरातलं स्वयंपाकघर हेल्दी नसेल तर घरात सुख मिळत नाही. वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीची दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर शुभ दिशेला असेल तर घरातील सदस्यांचे सौभाग्य वाढतं. जेव्हा स्वयंपाकघर शुभ दिशेला असतं तेव्हा देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते आणि घरात नेहमी सुख-समृद्धी नांदू लागते. चला जाणून घेऊया स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे?

स्वयंपाकघराची योग्य दिशा: वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना स्वयंपाकघर नेहमी आग्नेय कोनात म्हणजेच पूर्व-दक्षिण दिशेला असावे. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात. या ठिकाणी स्वयंपाकघर ठेवल्यास शुभ फळ मिळते. त्यामुळे स्वयंपाकघर पूर्व-दक्षिण दिशेला करणे चांगले मानले जाते. स्वयंपाकघरात दोन महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, एक अग्नीची दिशा आणि दुसरी पाण्याची दिशा.

स्वयंपाकघरात स्टोव्ह नेहमी आग्नेय दिशेला असावा, कारण ही दिशा आगीसाठी उत्तम मानली जाते. दुसरीकडे, स्वयंपाकघरात पाण्यासाठी नेहमी उत्तर दिशा निवडावी. जर तुम्ही किचन सिंक लावत असाल तर ते देखील उत्तर दिशेला लावावे.

स्वयंपाकघराशी संबंधित इतर वास्तु टिप्स:

उष्टी आणि खरकटी भांडी: वास्तुशास्त्रानुसार, उष्टी आणि खरकटी भांडी जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नयेत. अन्न खाल्ल्यानंतर लगेच भांडी स्वच्छ धुवून साफ करावीत. कारण असं मानलं जातं की, असं केल्याने देवी लक्ष्मी कोपते. घरात आर्थिक संकट निर्माण होते आणि जमा केलेले भांडवलही नष्ट होतं.

चाकू: चाकू कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, चाकूचे स्थान नेहमी सुनिश्चित केले पाहिजे. कारण इकडे-तिकडे चाकू ठेवल्याने घरातील लोकांमध्ये संताप वाढतो. तसेच नात्यात तणाव निर्माण होतो.

वास्तुशास्त्रानुसार अन्नपदार्थ, धान्य, मसाले, डाळी, तेल, मैदा आणि इतर खाद्यपदार्थ, भांडी, क्रोकरी इत्यादी साठवण्याची जागा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vastu shastra vastu tips for kitchen should be in this direction in home maa lakshami gives blessings prp

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!