Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा ‘या’ पाच गोष्टी

दिवाळीच्या निमित्ताने आजकाल बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत जे आपण वापरतो. पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका.

vastu tpis for diwali
वास्तु टिप्स प्रातिनिधिक फोटो

दिवाळी हा सण हिंदूंसाठी विशेष श्रद्धेचा सण आहे. सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून झाली आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. नियमानुसार पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. दिवाळीच्या दिवशी काही वास्तु टिप्स लक्षात ठेवून देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येते असे मानले जाते.

दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवा

ज्योतिषांच्या मते, दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. तिजोरीच्या दारावर उत्तरेकडे तोंड करून स्वस्तिकचे शुभ चिन्ह बनवा. खुणा करण्यासाठी तेल आणि हळद वापरा.

(हे ही वाचा: Diwali 2021: जाणून घ्या, नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)

दिव्यांची संख्या लक्षात ठेवा

दिवाळीच्या निमित्ताने आजकाल बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत जे आपण वापरतो. पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका. मातीचे दिवे लावूनच माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दिव्यांच्या संख्येकडे विशेष लक्ष द्या. घरात ११, २१, ३१, ४१ याच संख्यांमध्ये दिवे लावावे असे मानले जाते.

घरामध्ये मिठाचे पाणी शिंपडा

वास्तू तज्ञांचे मत आहे की दिवाळीच्या काळात घरात मीठाचे पाणी शिंपडणे खूप शुभ असते. असे मानले जाते की मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातून काढून टाकते. त्यामुळे भांड्यातून पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून घरभर शिंपडा.

( हे ही वाचा: Diwali 2021: मान्यतेनुसार दिवाळीत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ नक्की करा! )

प्रत्येक दिशा प्रकाशमय करा

दिवाळीच्या दिवशी घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका, तर सर्वत्र दिवे आणि लाईट लावा. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहते आणि पैशाची कमतरता नसते. कुटुंबात सुख-समृद्धी येते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. रांगोळीतून चालत गेल्यावरच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असे मानले जाते. त्यांच्या स्वागतासाठी स्वातीक, ओम, लक्ष्मी चरण इत्यादी रंगांची रांगोळी काढावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vastu tips on diwali remember these five things do at home ttg