Vat Purnima 2026 Messages Quotes Wishes in Marathi: देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या तिथीवर वटपौर्णिमा साजरी केली जाते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला तर मध्य भारतात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही २८ जूनला साजरी केली जाणार आहे. वैदिक पंचांगानुसार, यंदा २९ जून रोजी सकाळी ०६:३० ते दुपारी १२:३० या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रांनुसार, वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. या ६ तासांच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात. हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा देताना WhatsApp Status, इंस्टाग्राम स्टोरीज, फेसबुक पोस्ट हे महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वटपौर्णिमेच्या शुभेच्छा अगदी मराठमोळ्या ढंगात देण्यासाठी मराठी शुभेच्छा मेसेज, Wishes, HD Images, आम्ही शेअर करत आहोत. तुमच्या मैत्रिणींसह ही मराठी ग्रीटिंग्ज व शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून शेअर करू शकता.

वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा (Vat Savitri Purnima 2026 Shubhecha Wishes In Marathi)

सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !!

साथ सात जन्मांची, साथ त्यागाची
नात्यातल्या प्रेमाची अन् विश्वासाची
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या सण असाच आयुष्यभर लाभो
तुमच्या जीवनात आनंदव सुख नांदो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सौभाग्याची प्रार्थना..
वटवृक्षाची आराधना..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा
या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
वटपोर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा (Best Vat Purnima Quotes In Marathi)

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती-पत्नीची दृढ साथ
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

कुंकवाचा साज असाच कायम राहो
माझ्या धन्याला दीर्घायुष्य लाभो,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी