Vat Purnima 2026 Ukhane : साताजन्माच्या गाठी अधिक घट्ट करणारा आणि हिंदू संस्कृतीतील अखंड सौभाग्याचे लेणे असलेला सण म्हणजेच ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या पवित्र दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दिवसभर कडक उपवास ठेवतात. वटवृक्षाला (वडाच्या झाडाला) सूत गुंडाळून, मनोभावे पूजा करत ‘हाच पती जन्मोजन्मी मिळावा’ अशी प्रार्थना केली जाते.

यंदा २९ जून २०२६ रोजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी केवळ पारंपरिक शृंगारच नाही, तर मैत्रिणींच्या आग्रहाखातर घेतला जाणारा ‘उखाणा’ सुद्धा सणाची रंगत वाढवतो. विशेषतः लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा असणाऱ्या नववधूंसाठी हा सोहळा खूपच खास असतो. याच निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास, हटके आणि अगदी नवीन मराठी उखाणे!

वटपौर्णिमा स्पेशल उखाणे (Vat Purnima 2026 Special Ukhane Marathi)

१) वटपौर्णिमा आहे, सुवासिनींसाठी खास सण, …रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

२) पतीच्या दीर्घायुष्यासाठी, निष्ठेचे बंधन, …रावांचे नाव घेऊन, करते सर्वांना वंदन.

३) आयुष्यात सुख-दुःखे दोन्ही असावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

४) वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा, …रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा.

५) श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग, …राव नेहमीच राहू देत माझ्या संग.

६) वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा, …रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा.

वटपौर्णिमा उखाणे २०२६ (Vat Savitri Ukhane Marathi List)

७) सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड, …रावांची होती मला कॉलेजपासून आवड.

८) नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आकाश, …रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश.

९) वटपौर्णिमा म्हणून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे, …रावांचे नाव घेते, असेच सुखी राहूद्यात सारे.

१०) खुळं काळीज हे माझं, तुला दिलं मी आंदण, …रावांच्या संसारात सुखाने नांदन.

११) देव बनवतो साताजन्माची गाठ, …रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात.

१२) जीवनाला सुगंध असावा चंदनाचा, …रावांचे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा.

१३) भरजरी साडीला जरीचा खण, …रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.

१४) गुरूंनी दिले ज्ञान, आई-वडिलांनी दिले संस्कार, वटपौर्णिमेच्या दिवशी देते वचन, …रावांसोबत करेन संसाराची नौका पार.