Venus Rashi Parivartan: आज शुक्र ग्रहाचा धनु राशीत प्रवेश, पुढील एक महिना ‘या’ राशींवर असणार लक्ष्मीची कृपा

Venus/Shukra Tansit 2021: ऑक्टोबरच्या शेवटी शुक्र ग्रह राशी बदलणार आहे. आज शुक्र ग्रहाने धनु राशीत प्रवेश केलाय. पुढील एक महिना या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा राहणार. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी?

shukra-rashi-parivartan-2021

Venus/Shukra Tansit 2021: ऑक्टोबरच्या शेवटी शुक्र ग्रह राशी बदलणार आहे. ३० ऑक्टोबरला म्हणजेच आज शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह आर्थिक समृद्धी, प्रेम, सुसंवाद आणि भौतिक सुखसोयी आणि संसाधनांचा वापर दर्शवितो, म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शुक्राचे स्थान खूप महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्रातही शुक्राच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. ३० ऑक्टोबरला म्हणजेच आज शुक्र ग्रहाने वृश्चिक राशीतून निघून दुपारी ०३.५६ वाजता धनु राशीत प्रवेश केलाय. यानंतर ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.५६ वाजता शुक्र धनु राशीतून मकर राशीत जाईल.

शुक्राच्या राशीतील बदलामुळे काही राशींसाठी शुभ परिणाम मिळतील. पुढील एक महिना या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा राहणार. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी?

मेष : शुक्र धनु राशीत प्रवेश केल्याने मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या राशीच्या लोकांना कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. शुक्र मेष राशीच्या नवव्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे या राशीच्या लोकांची धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. या राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना यश मिळेल.

सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या बदलामुळे नात्यात गोडवा येईल. या राशीच्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांवरही आई लक्ष्मीची कृपा असेल आणि त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

धनु: धनु राशीत शुक्र ग्रहाच्या प्रवेशामुळे या राशीच्या लोकांची सर्जनशीलता वाढेल. चित्रकला, संगीत आणि सिनेमाशी संबंधित असलेल्या धनु राशीच्या लोकांना फायदा होईल. कार्यक्षेत्रात तुमचे कौतुक होईल. या काळात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Venus transit on 30 october in sagittarius know these zodiac sign get more money and wealth shukra ka rashi parivartan prp

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या