टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने (Vi ) नव्या वर्षामध्ये आपली 3जी सिम सेवा अजून एका शहरात बंद करण्याची योजना आखली आहे. Vodafone Idea (Vi) आगामी 15 जानेवारीपासून दिल्लीमध्ये 3G सेवा बंद करणार आहे. कंपनीकडून आपल्या 3जी सिम युजर्सना मेसेज आणि कॉलद्वारे 15 जानेवारीपर्यंत 3जी सिमकार्ड 4G मध्ये पोर्ट करण्यास सांगितलं जात आहे.

कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन 4 जीमध्ये करा पोर्ट:- 
व्होडाफोन-आयडियाने गेल्या वर्षीच बेंगळुरु आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये आपली 3जी सिम सेवा बंद केली आहे. आता दिल्लीतही ही सेवा बंद करण्याचं कंपनीने जाहीर केलंय. त्यामुळे दिल्लीचे Vi ग्राहक आपल्या जवळच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन आफलं सिम कार्ड 4जीमध्ये पोर्ट करु शकतात. यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारलं जाणार नाही.

आणखी वाचा- Reliance Jio ने केली मोठी घोषणा, ग्राहकांना दिलं नववर्षाचं जबरदस्त ‘गिफ्ट’

2जी व्हॉइस कॉलिंग सेवा सुरू राहणार :-
Vodafone Idea (Vi) चे सध्याच्या 2जी युजर्सची व्हॉइस कॉलिंग सेवा सुरूच राहणार आहे. मात्र, ते जुन्या सिमवर इंटरनेटचा वापर करु शकणार नाहीत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानुसार (TRAI), दिल्ली सर्कलमध्ये Vi चे एक कोटी 62 लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यातील 3जी युजर्सना आता 15 जानेवारीपर्यंत आपलं सिम 4जीमध्ये पोर्ट करावं लागेल.